महाराष्ट्र
Trending

महाराष्ट्रात लहान मुलांच्या चोरीच्या अफवा, मूल चोरीच्या संशयावरून जमावाने हॉटेल कर्मचाऱ्यास बेदम मारले !

पोलिसांनी लोकांच्या तावडीतून सोडवून रुग्णालयात केले दाखल

ठाणे (महाराष्ट्र), ३० सप्टेंबर – महाराष्ट्रातील ठाणे शहरातील दिवा येथे बालक चोरीच्या संशयावरून एका ३० वर्षीय व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केली. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

एक अधिकारी म्हणाला, ही घटना गुरुवारी दुपारी घडली असून पीडित पिंटू निसार याला पोलिसांनी वाचवले असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेत निसारला अनेक जखमा झाल्या आहेत.

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “निसार स्थानिक हॉटेलमध्ये काम करतो. दिवा येथे ते रस्त्याच्या कडेला उभे असताना एक ट्रक त्यांच्याजवळून गेला. ट्रक पाहून तो आपल्या जागेवरून थोडा मागे सरकला त्यामुळे त्याच्या मागे उभ्या असलेल्या मुलीला धक्का बसला आणि ती खाली पडली. मात्र जेव्हा निसारने मुलीला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलीच्या आईने तिला बालचोर समजले आणि ओरडण्यास सुरुवात केली.

त्यांनी सांगितले, “लवकरच लोक तेथे जमले आणि त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉडसह जे काही हाती आले, ते घेऊन त्यांनी निसार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान पीडित तरुण लोकांना तो बालक चोर नसल्याची विनवणी करत होता. पण लोक त्यावर हल्ले करत राहिले.

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाच्या तावडीतून व्यक्तीची सुटका केली. या हल्ल्यात त्या व्यक्तीला अनेक दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कडलग यांनी माहिती दिली की, या घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी लहान मुलांच्या चोरीच्या अफवांकडे लक्ष देऊ नये.

Back to top button
error: Content is protected !!