महाराष्ट्र
Trending

जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी वकिलाला सहा महिन्यांची शिक्षा !

ठाणे, 14 ऑक्टोबर – महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा न्यायालयाने एका व्यक्तीवर जातीवाचक टिप्पणी केल्याप्रकरणी वकिलाला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

विशेष न्यायाधीश ए. एस भागवत यांनी बुधवारी अधिवक्ता राजन साळुंके यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या संबंधित कलमांखालील गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आणि त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. तसेच 1500 रुपयांचा दंड ठोठावला.

विशेष सरकारी वकील (एसपीपी) रेखा हिवराळे यांनी न्यायालयाला सांगितले की, तक्रारदाराने पालघर जिल्ह्यातील खारिवली गावातील या वकिलाला २०१५ मध्ये एक लाख रुपयांचे कर्ज दिले होते, परंतु वकिलाने ती रक्कम परत केली नाही.

ते म्हणाले, “तक्रारदार त्या वकिलाच्या कार्यालयात पैसे मागण्यासाठी गेला असता, वकिलाने तक्रारदाराला शिवीगाळ करून जातीवाचक शेरेबाजी केली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला,” असे ते म्हणाले.

आरोपीच्या वकिलाने सांगितले की, जमिनीच्या वादामुळे त्याच्या अशिलाला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे.

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आरोपीने असा गुन्हा केला आहे, ज्यामुळे समाजातील वातावरण बिघडेल आणि मत्सर वाढेल.

Back to top button
error: Content is protected !!