महाराष्ट्र
Trending

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर, ११४ उमेदवारांची शिफारस

मुंबईदि. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. ०६ ऑगस्ट२०२२ व दि. २० ऑगस्ट२०२२ रोजी मुंबईसह औरंगाबादअमरावतीनागपूरनाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील दुय्यम निरीक्षकराज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल दि. ०५ डिसेंबर२०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे.  एकूण ११४ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

            परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील श्री. आनंद नाना जावळे हे राज्यातून व मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून सातारा  जिल्ह्यातील अक्षता बाबासाहेब नाळे ह्या प्रथम आल्या आहेत.

             उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

             अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांतआयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

Back to top button
error: Content is protected !!