महाराष्ट्र
Trending

एमआयडीसी मालकीच्या 181 औद्योगिक भूखंडांना महाराष्ट्र सरकारची मान्यता ! उर्वरित 10 भूखंडांचा आढावा घेऊन निर्णय !!

मुंबई, 20 सप्टेंबर – वेदांता-फॉक्सकॉनच्या अब्जावधी डॉलर्सच्या अर्धसंवाहक प्रकल्प गुजरातला पळवल्याप्रकरणी टीकेचा धनी झालेल्या महाराष्ट्र सरकारने 181 औद्योगिक भूखंड मंजूर केले आहेत. हे भूखंड तत्कालीन महाविकास आघाडी (MVA) सरकारने मंजूर केले होते, हे विषेश.

महाराष्ट्रात, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उद्योग विभागाला 191 भूखंडांचे पुनरावलोकन करण्यास सांगितले होते. हे भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीचे आहेत. याला या वर्षी १ जून नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकारने मान्यता दिली होती.

एका अधिकाऱ्याने मंगळवारी माहिती दिली की, त्यापैकी 181 भूखंडांना मंजुरी देण्यात आली असून उर्वरित 10 भूखंडांचा आढावा घेण्यात येत असून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले होते की, राज्यात औद्योगिक भूखंड वाटपावर शासनाने बंदी घातलेली नाही.

Back to top button
error: Content is protected !!