राष्ट्रीय
Trending

स्कूल बॅगमधून सळसळ करत साप बाहेर आला ! शाळेतील विद्यार्थी-शिक्षकांमध्ये उडाली एकच खळबळ !!

दतिया (मध्य प्रदेश), 26 सप्टेंबर – मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात 10 वीच्या विद्यार्थिनीच्या स्कूल बॅगमधून साप बाहेर आल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एकच घबराट पसरली आहे.

एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली की, उमा रजक या दहावीच्या विद्यार्थिनीला तिच्या बॅगेत काही हालचाल जाणवली. एका शिक्षकाने रजक यांची बॅग क्रीडांगणात रिकामी केली असता, त्यातून साप निघाला. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली.

ही घटना 22 सप्टेंबर रोजी बडोनी शहरातील सरकारी हायस्कूलमध्ये घडली होती, परंतु सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमवारी ही घटना समोर आली.

जिल्हा शिक्षणाधिकारी यू.एन.मिश्रा यांनी सांगितले की, साप मुलीच्या घरात तिच्या पिशवीत घुसला होता.

Back to top button
error: Content is protected !!