राष्ट्रीय
Trending

यमुना नदी धोक्याच्या पातळीवर ! यंदाची सर्वाधिक वाढ, अलर्ट जारी !!

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर – नदीच्या पाण्याची पातळी 205.33 मीटरच्या धोक्याच्या चिन्हापेक्षा 206.16 मीटरने वाढल्याने यमुना नदीच्या काठावरील सखल भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दिल्लीत “अलर्ट” जारी करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसानंतर पाणीपातळीत यंदाची सर्वाधिक वाढ आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

पूर्व दिल्लीचे जिल्हा दंडाधिकारी अनिल बांका यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी पाण्याची पातळी २०६ मीटरचा टप्पा ओलांडल्यानंतर लोकांना बाहेर काढण्यासाठी ‘अलर्ट’ जारी करण्यात आला होता.

ते म्हणाले, “नदीच्या काठावरील सखल भाग रिकामा करून लोकांना उंच ठिकाणी हलवले जात आहे. त्यांच्या मुक्कामाची सरकारी शाळा आणि लगतच्या भागात रात्रीच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.”

दिल्लीतील नदीकाठच्या सखल भागांना पूरप्रवण क्षेत्र मानले जाते, जेथे सुमारे 37,000 लोक राहतात. पूरसदृश परिस्थितीमुळे सखल भागात राहणाऱ्या लोकांना अधिकाऱ्यांनी बाहेर काढण्याची दोन महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे.

दिल्ली पूर नियंत्रण कक्षाने सांगितले की, जुन्या दिल्ली रेल्वे पुलावरील पाण्याची पातळी मंगळवारी सकाळी 6.45 वाजता 206 मीटर ओलांडली. सकाळी 8 वाजेपर्यंत नदीतील पाण्याची पातळी 206.16 मीटरपर्यंत वाढली. पूर नियंत्रण कक्षाच्या अंदाजानुसार, दिवसभरात दुपारी 3 ते 5 या वेळेत पाण्याची पातळी 206.5 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हरियाणातील हथनीकुंड बॅरेजमधून सकाळी 7 वाजता सुमारे 96,000 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!