राष्ट्रीय
Trending

मदरसा आणि मशिदीचा दरवाजा तोडून जमावाने हिंदुत्ववादी घोषणा दिल्या, नऊ जणांवर गुन्हा !

बिदर (कर्नाटक), 7 ऑक्टोबर – लोकांच्या एका गटाने महमूद गवान मदरसा आणि तेथील मशिदीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि कथितरित्या हिंदुत्ववादी घोषणा दिल्या, त्यानंतर पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कर्नाटक राज्यातील बिदरमध्ये हा प्रकार घडला.

मस्जिद समितीचे सदस्य आणि तक्रारदार मोहम्मद शफीउद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे दुर्गा मूर्तीच्या विसर्जनासाठी मिरवणूक निघाली असताना ही घटना घडली.

असा आरोप आहे की, सुमारे ६० जणांनी पुरातत्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूत घुसून हिंदुत्ववादी घोषणा दिल्या आणि परिसरात गुलालही उधळला. तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना धमकावल्याचा आरोपही जमावावर आहे, ज्यांनी लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट केले की ‘चरमपंथियों’’ ने विरासत स्मारक को अपवित्र करने का प्रयास किया।

एक व्हिडिओ शेअर करत ओवेसी यांनी ट्विट केले की, ‘‘कर्नाटक के बीदर में ऐतिहासिक महमूद गवां मस्जिद एवं मदरसे के (पांच अक्टूबर के) दृश्य। चरमपंथियों ने ताला तोड़ा और (मस्जिद को) अपवित्र करने की कोशिश की। बीदर पुलिस और (कर्नाटक के मुख्यमंत्री बसवराज एस) बोम्मई, आप ऐसा कैसे होने दे सकते हैं? भाजपा (भारतीय जनता पार्टी) मुसलमानों को केवल नीचा दिखाने के लिए इसे बढ़ावा दे रही है।’’

शफीउद्दीनने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, या जिल्हा मुख्यालयात शांतता आणि सौहार्द बिघडवण्याचा आणि हिंसाचार घडवण्याच्या दुर्भावनापूर्ण हेतूने समाजकंटक अनेक दिवसांपासून सक्रिय आहेत. त्यांनी आरोप केला की, समाजकंटकांनी आवारात मूर्ती किंवा छायाचित्रे लावली आणि धार्मिक आणि सरकारी स्मारकांमध्ये प्रवेश केला.

शफीउद्दीनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “हे लोक देशाविरोधात घोषणा देत होते आणि इतर समुदायाला भडकावण्याचा प्रयत्न करत होते, हेही तुमच्या निदर्शनास आले आहे.”

बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले.

पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर तणाव वाढल्याने त्यांनी मदरशाभोवती सुरक्षा वाढवली आहे.

Back to top button
error: Content is protected !!