महाराष्ट्र
Trending

सिटी बसला आग, करमाड ते सिडको बस वरूड फाट्यावर पेटली ! मागच्याच महिन्यात केली होती सर्व्हिसिंग !!

औरंगाबाद, दि. 18 –: करमाड ते सिडको सिटी बस क्रमांक 43 मध्ये तांत्रिक कारणामुळे वरूड फाट्यावर रविवारी आग लागून नुकसान झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. बस ची निर्माता टाटा कंपनी चे पथक येऊन घटनास्थळ वर पाहणी करून तांत्रिक तपास पूर्ण करणार आहे. त्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होईल, अशी अधिकार्यांनी माहिती दिली.

रविवारी दुपारी जवळपास 12.30 वाजता सिटी बस क्रमांक 43 (MH20EL1363) करमाड वरून सिडको बस स्थानकाकडे प्रवाश्यांना घेऊन जात होती. तेव्हाच चालकाला असे लक्षात आले की चाका मधून आवाज येत आहे. तेंव्हा चालकाने बस मधील सर्व 6 प्रवाश्यांना खाली उतरवले आणि बस डेपो वर उपलब्ध मेकॅनिकला मदतीसाठी फोन लावला.

मेकॅनिकच्या म्हणण्यानुसार चालकाने गाडी बंद करून परत सुरू केली. तेव्हा चालकाच्या असे लक्षात आले की इंजिनला आग लागली आहे. हे बघून चालक आणि कंडक्टरने तत्काळ बस मध्ये उपलब्ध फायर चे सिलिंडर वापरून आग वीजवण्याचे प्रयत्न केले. परंतु आग वाढली. आगीमुळे बसचा वरचा भाग क्षतिग्रस्त झाला आहे व इंजिनचे काही पार्ट जळून गेले.

सिटी बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर घटना स्थळी पोहोचले, त्यांनी माहिती दिली की बसची कंपनी टाटा कडून एक पथक येऊन क्षतिग्रस्त बसची पाहणी करून आगीचे कारण काय होते याचा तपास करतील.

सदर बसची नियमित सर्व्हिसिंग मागच्याच महिन्यामध्ये टाटाच्या सर्विस सेंटर येथे झाली होती. आता कंपनी कडून तपासणी झाल्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होईल आणि त्याचवर पुढचे निर्णय घेतला जाईल, असे पावनिकर यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!