महाराष्ट्र
Trending

शेंद्रा ते वाळूज औद्योगिक क्षेत्रापर्यंत मेट्रो लाईनचा प्लॅन तयार करण्याचे निर्देश ! सर्वसमावेशक आराखड्याचे सादरीकरण !!

येत्या 30 वर्षाचा सुरक्षित, सोयीस्कर शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी कंप्रेहेवसिव मोबिलिटी प्लॅन

Story Highlights
  • सध्या प्राथमिक स्तरावर मेट्रो सुविधा शेंद्रा एम आय डी सी ते रेल्वे स्टेशन पर्यंतच ठेवण्यात आली आहे. पण डॉ कराड यांनी मेट्रो लाईन चे प्लॅन शेंद्रा ते वाळूज औद्योगिक क्षेत्रापर्यंत तयार करण्यासाठी सूचना दिली.

औरंगाबाद, 31: येणाऱ्या पुढच्या 30 वर्षांसाठी शहराच्या वाहतूक गरजा व वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेऊन तयार केलेल्या कॉम्प्रिहंसिव्ह मोबिलिटी प्लॅन अर्थात सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्याचे सादरीकरण केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांच्यासमोर औरंगाबाद स्मार्ट सिटी मुख्यालयात करण्यात आले.

यावेळी माजी विधान सभा अध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ अभिजित चौधरी, सिडको प्रशासक दीपा मुधोल मुंडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शहर अभियंता सखाराम पानझडे, महावितरण चे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, छावणी परिषदचे सीईओ संजय सोनवणे, आरटीओ, शहर पोलिस, औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी, भारतीय सेना, भारतीय रेल, स्मार्ट सिटी व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जानेवारी महिन्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी ने शहरासाठी पहिले सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यासाठी व शेंद्रा ते वाळूज पर्यंत मेट्रोचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी महा मेट्रो या शासकीय एजन्सी ची नियुक्ती केली होती.

औरंगाबाद शहरात तीस वर्षांच्या वाढत्या लोकसंख्येला तसेच वाहन संख्यला लक्षात घेता सुरक्षित, सोयीस्कर, दर्जेदार व भरवशाची शहरी वाहतूक व्यवस्था कशी विकसित करता येईल यासाठी केंद्रीय नगर विकास मंत्रायलाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शहरासाठी कॉम्प्रीहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये असे मुख्यतः आढळून आले की शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्याची गरज आहे, तसेच पायी चालण्यासाठी योग्य व्यवस्थित ची कमतरता असून फुटपाथ व सायकल चालवण्यासाठी सुविधेची गरज आहे. शहराची पार्किंग व्यवस्था व वाहतूक सुरक्षा मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असेही समोर आले आहे.

कॉम्प्रेशन मोबिलिटी प्लॅन मध्ये सुचवण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये रोड नेटवर्क मध्ये सुधारणा करणे, पायी चालणे व सायकल चालवण्याच्या व्यवस्थेत सुधारणा करणे, ट्रॅफिक जंक्शन सुरक्षित करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी उपाय योजना करणे, मालवाहक वाहतूकिला मजबूत करणे, व पार्किंग व्यवस्थेवर कार्य करणे ह्यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी महा मेट्रो ने 2052 पर्यंत टप्प्या टप्यात 6278 कोटी रुपये एवढा अंदाजित खर्च दर्शवला आहे.

शहराच्या वाहतूक बघताना महा मेट्रो कडून शहराच्या मुख्य रस्त्यावर निओ मेट्रो प्रकल्प सुचवण्यात आले आहे. सध्या प्राथमिक स्तरावर मेट्रो सुविधा शेंद्रा एम आय डी सी ते रेल्वे स्टेशन पर्यंतच ठेवण्यात आली आहे. पण डॉ कराड यांनी मेट्रो लाईन चे प्लॅन शेंद्रा ते वाळूज औद्योगिक क्षेत्रापर्यंत तयार करण्यासाठी सूचना दिली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ चौधरी ह्यांनी सूचना दिली की बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार मेट्रोच्या प्लॅन मध्ये बदल करून परत सादरीकरण देण्यात यावे.

अर्बन मास ट्रान्झिट कंपनी (यु एम टी सी) चे एस रामकृष्णन ह्यांनी कंप्रेहेन्सिव मोबीलिटी प्लॅन चे सादरीकरण केले व महा मेट्रो चे विकास नगुलकर व साकेत केलकर ह्यांनी महा मेट्रो व मेट्रो निओ बद्दल सादरीकरण केले.

Back to top button
error: Content is protected !!