महाराष्ट्र

राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश !

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मुंबई, दि.११ राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत अध्यापकांचे मानधन दिवाळी पूर्वीच करावे असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतू काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारीची तातडीने दखल घेऊन दिवाळीपूर्वी दिनांक २१ ऑक्टोबर२०२२ पर्यत त्यांच्या थकीत मानधन देण्यात यावे.

याबाबत संबंधित उच्च व तंत्र शिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी मिळेल याकडे लक्ष द्यावे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!