राष्ट्रीय
Trending
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, द्वेषयुक्त भाषणावर स्वतःहून तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश !
- देशाची धर्मनिरपेक्ष जडणघडण टिकवून ठेवण्यासाठी धर्माचा विचार न करता द्वेषयुक्त भाषण देणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे खंडपीठाने म्हटले आहे.
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर – द्वेषयुक्त भाषणे ही “अत्यंत गंभीर समस्या” असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सरकारांना अशा प्रकरणांमध्ये तक्रार दाखल होण्याची वाट न पाहता संबंधीतांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले.
सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला की, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा विलंब केल्यास न्यायालयाचा अवमान होईल.
न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने शाहीन अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर दोन्ही राज्य सरकारांना नोटीसही बजावली.
देशाची धर्मनिरपेक्ष जडणघडण टिकवून ठेवण्यासाठी धर्माचा विचार न करता द्वेषयुक्त भाषण देणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे खंडपीठाने म्हटले आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट