महाराष्ट्र
Trending

गोदावरीतून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या माफियांचा घनसावंगी तहसील पथकावर हल्ला, स्वीफ्ट कार आडवी लावून जप्त केलेल्या टिप्परमधून कोतवालला खाली ओढले !!

जालना, दि. ८ – गोदावरीतून चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांनी घनसावंगी तहसील पथकावर हल्ला चढवला. जप्त केलेले टिप्पर पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी निघालेल्या पथकांच्या गाड्यासमोर स्वीफ्ट कार आडवी लावली. पथकासोत दमदाटी करून टिप्परमध्ये बसलेल्या कोतवालाला खाली ओढले. टिप्परमधील वाळू पथकासमोरच खाली करून टिप्पर पळवून नेल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव शिवारात घडली.

याप्रकरणी टिप्पर मालक राहुल जाधव (रा. घनसावंगी) याच्यासह तीन ते चार जणांवर घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडळ अधिकारी किसन भाऊराव खोतकर (वय 54 वर्षे, व्यवसाय नौकरी, मंडळ अधिकारी अंतरवाली टॅभी तहसिल कार्यालय ता. घनसावंगी, रा. पोस्ट ऑफिसचे पाठीमागे नवा जालना) हे अंतरवाली टेंभी सर्कलचे कामकाज पाहतात. यासंदर्भात मंडळ अधिकारी किसन भाऊराव खोतकर यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, पी.यु काटकर तलाठी ए.बी. शिदे, तलाठी, एस. जी. बिकक्ड तलाठी एस. डी. देशपांडे तलाठी सर्व जण अवैद्य वाळु गौण खनिज प्रतिबंधक पथकामध्ये नेमणुकिस आहे. दिनांक 07/12/2022 रोजी मंडळ अधिकारी किसन भाऊराव खोतकर व पथकातील सर्वजण तहसिल कार्यालय घनसावंगी येथे हजर होते.

यावेळी त्यांना बातमी मिळाली की, शिवनगाव शिवारात गोदावरी नदी पात्राजवळ काही वाहनाने वाळुची अवैद्य चोरटी वाहतूक सुरु आहे. ही बातमी मिळाल्याने पथकातील कर्मचारी तसेच तहसिलदार कविता गायकवाड व नायब तहसिलदार गणेश सुपे दोन खाजगी वाहनाने रात्री 10.00 वाजेच्या सुमारास शिवनगाव कडे जात असताना समोर एक पिवळ्या रंगाचा टिप्पर दिसला.

अंदाचे दोन ब्रास वाळु भरलेला असावा. पथकाने त्यास थांबवून विचारणा केली असता टिप्पर चालकाने गोदावरी नदी पात्रातून वाळू आणल्याचे सांगितले. टिपरवर पासिंग क्रमांक दिसून आला नाही. सदर टिप्पर चालकाने त्याचे नाव न सांगता मालक राहुल जाधव (रा. घनसावंगी) असल्याचे सांगितले. गौण खनिज वाहतुक परवाना त्याच्याकडे आढळून आला नाही.

त्यामुळे पथकाने वाळूने भरलेला टिप्पर पोलिस ठाण्यास लावण्याचे सांगितले. सदर टिप्पर वाहनात पथकातील कोतवाल लहु घायतडक यांना बसवून सर्व पथक घनसावंगी पोलिस स्टेशनच्या दिशेने रवाना होत असताना समोरून एक पांढ-या रंगाची स्विफ्ट कार (पासिंग क्रं MH 46W 9277) आली. त्यांनी पथकाच्या वाहना समोर त्यांची कार लावून पथकाचा मार्ग अडवला.

त्या गाडीतून राहुल जाधव (रा. घनसावंगी) व त्याचे सोबत तीन ते चार जण खाली उतरले. त्यानंतर राहुल जाधव यांने पथकासोबत दमदाटी करून आरेरावीची भाषा केली. त्यानंतर टिप्परमध्ये बसलेले कोतवाल लहु घायतडक यांना खाली ओढून मारहान केली. पिवळ्या रंगाचा टिप्पर मधील अंदाजे दोन ब्रास वाळू पथकासमोर खाली करुन सदर टिपर घेवून पळून गेले.

याप्रकरणी मंडळ अधिकारी किसन भाऊराव खोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!