महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी, शाळास्तरावर जंतनाशक मोहीम राबवणार, घरोघरी जावून आशामार्फत गोळ्यांचे वाटप करणार !

औरंगाबाद,दि. 07 : जंतनाशक मोहीम 10 ऑक्टोबर रोजी राबविण्यात येणार आहे. जंतामुळे बालकांसह मुलांची बौद्धिक, शाररिक वाढ खुटते सुद्दढ आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. बालकांमध्ये जंताचा प्रादुर्भाव. परिणामी रक्तक्षय आणि कुपोषणाबरोबरच बालकांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ खुंटते. अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी जिल्हयात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे.

जंतामुळे अनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे, कुपोषण, थकवा व अस्वस्थता आतड्यास सूज येणे असे परिणाम बालकांवर होतात. एक ते 19 वर्षे वयोगटातील मुला- मुलींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते.

अशी घ्या काळजी- हात स्वच्छ धुवावेत, शौचालयाचा नियमित वापर करावा. पायात पादत्राणे घालावीत. निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे, व्यवस्थित शिजवलेला आहार घ्यावा. निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत. नखे स्वच्छ ठेवावीत. त्यामुळे जंतूसंसर्ग थांबविण्यास मदत होईल. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले. जिल्हयातील ग्रामीण भागातील सात लाख 60 हजार 120 बालकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्याचे नियोजन आरोग्य विभाग, जिल्हा परिषेद कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

ही मोहीम शाळा, अंगणवाडीस्तर वर राबविण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेपासून वंचित राहिलेल्या आणि शाळाबाह्य बालकांसाठी 17 ऑक्टोबर रोजी गृहभेटीतून आशामार्फत गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.

वैयक्तिक व परिसर अस्वच्छता, दुषित माती, अस्वच्छ हात, अस्वच्छ फळे, भाज्या व अन्नामुळे ताचा प्रादुर्भाव होतो. या गोळीमुळे मुला- मुलींचे आरोग्य चांगले राहते. पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावतो, असे डॉ. रेखा भंडारे, माता व बालसंगोपन अधिकारी यांनी सांगितले.

या मोहिमेमध्ये आपल्या पाल्यास सर्व पालकांनी जंतनाशक गोळी पासून वंचीत राहणार यांची दक्षता घ्यावी असे अवाहन जिल्हाधिकारी ,सुनिल चव्हाण यांनी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद, डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद, डॉ. रेखा भंडारे , माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद यांना केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!