महाराष्ट्र

हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 3 डिसेंबरला !

हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनची वार्षिक सभा उत्साहात

औरंगाबाद- चालू शैक्षणिक वर्षात सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 03  डिसेंबर 2022 या रोजी घेण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन ची वार्षिक सभा 06 नोव्हेंबर 2022 रविवारी रोजी औरंगाबाद येथे कार्यालयात पार पडली. यावेळी हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कायदेशीर सल्लागार इरफान खान यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद अब्दुल रहीम तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम होते. खेळी मेळीच्या वातावरनात सभा उत्साहात झाली. शेख अब्दुल रहीम या सर्वांना पहिल्यादा फॉउंडेशन चे उद्देश आणि कार्य सांगितले नंतर सर्वानुमते प्रामुख्याने नवीन राज्य व जिल्हा  कार्यकरिणीची निवड करण्यात आली. सर्व प्रथम मोरबी गुजरात येथे झालेल्या घटनेमध्ये मृत पावलेले लोकांसाठी श्रध्दांजली वाहण्यात आली.

या नंतर चालू शैक्षणिक वर्षात सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 03  डिसेंबर 2022 या रोजी घेण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. मागील 2 वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा वगळून सर्व उपक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन घेण्यात आले होते आता सर्व काही ऑफलाईन अणि प्रत्यक्ष होणार आहे. यात विद्यार्थ्यांसाठी  शुद्धलेखन स्पर्धा आणि वाचन प्रेरणा दिन येत्या 15 ऑक्टोबर रोजी डॉ. ए पी जे कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

तसेच 1 डिसेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांच्या वाढदिवसानिमित औरंगाबाद येथील बालअनाथआश्रम मध्ये भोजनाची व्यवस्था तसेच फॉउंडेशन च्या वर्धापन दिन आणि भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर, नशा मुक्त जनजागृती अभियान तसेच बिस्कीट आणि फळे वाटप कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांच्या नियोजनाबद्दल परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी चर्चा करून सर्वानुमते करून ठराव घेण्यात आले.

2023 मध्ये होऊ घातलेल्या मराठवाडा शिक्षक निवडणुकीत सर्वानुमते एक वेगळी बैठक घेऊन पाठिंबा कोणाला द्यायचा निर्णय घेण्यात येईल. या कार्यक्रमासाठी काही सूचना आणि मार्गदर्शन शेख अब्दुल रहीम, शफीक पठाण, सय्यद अब्दुल रहीम यांनी केले. तसेच अध्यक्षणीय भाषण इरफान खान यांनी केले. नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष शफीक पठाण तसेच राज्य कोषाध्यक्ष पदी शेख शकुर यांची तर राज्य संघटक पदी अमोल कुलकर्णी तसेच राज्य कार्याध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी सय्यद ताजीमोद्दीन तर मराठवाडा अध्यक्ष पदी अरशद पठाण यांची निवड करण्यात आली.

सिल्लोड तालुका कार्यकारिणी मध्ये थोडा फार बदल करून तालुका अध्यक्षपदी शेख इलियास, तालुका सचिव पदी शेख जफर यांची आणि  शहराध्यक्ष जुनेद कुरैशी तर शहर सचिव शेख तौफिक ( गुड्डू) यांची निवड एकमताने करण्यात आली. याच बरोबर महिला राज्यकार्यकरिणी गठीत करण्यात आली यात महिला राज्याध्यक्षा म्हणून मुंबई येथील शिक्षिका सुनेहरा बेगम सरफराज तर राज्य उपाध्यक्षा औरंगाबाद येथील शिक्षिका गुलनार तहसीलदार व राज्य सरचिटणीस शाहीन नाज यांची निवड कोर कमिटीच्या एकमताने करण्यात आली.

परभणी जिल्हाध्यक्ष पदी अजीम अहेमद खान तर लातूर जिल्हाध्यक्ष पदी जावेद बाबूलाल शेख यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच नवीन सदस्य प्राध्यापक शेख अमर अणि मो. इलियास सिद्दीकी यांची मराठवाडा संघटक पदी तर फैसल अहेमद खान यांची जळगाव जिल्हा अध्यक्षपदी तर पठाण इमरान अयुब खान यांची सिल्लोड तालुका संघटक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

काही सदस्यांनी झूम मीटिंगद्वारे आपली उपस्थिती दर्शवली. सर्वाना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सय्यद अब्दुल रहीम, संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचे स्वागत केले. संस्थापक सदस्य शाहरुख पठाण यांच्या आभार प्रदशनानंतर सभा संपन्न झाली.

या कार्यक्रमासाठी संस्थापक सचिव शेख शब्बीर ,  सय्यद अब्दुल रहीम, तालुका अध्यक्ष शेख जफर, नजीर पठाण ,शेख शकुर ,राज्य सह सचिव शेख साबीर , जुनेद कुरेशी , शेख समीर ,शेख इसाक, सरफराज पठाण  सह आदींची उपस्थिती होती तसेच नवनियुक्त महिला राज्याध्यक्षा शेख सूनहेरा सरफराज, परभणी नवनिर्वाचित नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अजीम अहेमद खान, लातूरचे नवनिर्वाचित व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष जावेद बाबूलाल शेख, शेख रहीम (अरमान), शेख वसीम, सलमान शाह, पठाण अनिस, हिना खान, पठाण इम्रान अयुब खान आदींची झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!