राष्ट्रीय
Trending

मशिदीजवळ गरब्यास विरोध करणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या जमावाचा हल्ला, पोलिसांची संशयितांस भरचौकात विजेच्या खांबाला लावून काठीने मारहाण !

खेडा, ४ ऑक्टोबर – गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील मशिदीजवळ गरबा आयोजित करण्यास विरोध करणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या जमावाने कार्यक्रमस्थळावर केलेल्या हल्ल्यात एका पोलिसासह सात जण जखमी झाले. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांना पोलिसांनी गावातील चौकाचौकात विजेच्या खांबाला लावून त्यांच्यासमोरच लाठीमार केला.

कथितपणे व्हिडिओ क्लिपमध्ये दिसून आले आहे की, जिल्ह्यातील उंडेला गावात सोमवारी रात्री गरबा कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांवर दगडफेक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन जणांना घटनास्थळाजवळील पोलिस व्हॅनमधून बाहेर काढण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपींना नंतर विजेच्या खांबाकडे नेले जाते आणि एक पोलीस त्यांना विद्युत खांबाजवळ धरून उभे करतो, तर दुसरा पोलीस त्यांना कमरेच्या खाली काठीने मारताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलिसांच्या म्हणन्यानुसार कथित हल्लेखोर घटनास्थळी उपस्थित लोकांची हात जोडून माफी मागतात. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले.

पोलीस उपअधीक्षक व्ही.आर. बाजपेयी म्हणाले की, मातर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी १३ जणांना अटक केली. ते म्हणाले की, या घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बाजपेयी पत्रकारांना म्हणाले, “गावच्या सरपंचाने मंदिरात गरबा आयोजित केला होता. मुस्लिम समुदायाच्या जमावाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणाले की, जमावाने दगडफेकही केली. ग्राम रक्षक दल (जीआरडी) जवान आणि एका पोलिसासह किमान सात जण जखमी झाले, असे त्यांनी सांगितले.

अधिकारी म्हणाले की, “एफआयआरनुसार, महिलांसह 150 लोकांच्या जमावाने गरबा ग्रुपवर दगडफेक करून हल्ला केला. एफआयआरनुसार 43 आरोपींची त्यांच्या नावावरून ओळख पटली आहे.

उपअधीक्षक बाजपेयी यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलमांतर्गत खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर सभा आणि जाणूनबुजून दुखापत या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ते म्हणाले, “सरपंचांनी अष्टमीला (नवरात्रीच्या आठव्या दिवशी) गावच्या मंदिरात गरब्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, पण जमावाने कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला.”

खेडाचे पोलिस अधीक्षक राजेश गढिया यांनी सांगितले की, “आरिफ आणि झहीर नावाच्या दोन व्यक्तींच्या नेतृत्वाखाली लोकांच्या एका गटाने नवरात्री गरबा स्थळी प्रवेश केला आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी दगडफेकही केली.”

ते म्हणाले, “आम्ही गावात शांतता राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.”

एफआयआरनुसार, गावातील मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी मंदिराजवळ असलेल्या मशिदीजवळ गरब्याचे आयोजन करण्यास आक्षेप घेतला होता. त्यानुसार रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमस्थळी जमलेल्या एका टोळक्याने भाविकांना शिवीगाळ करत गरबा थांबवण्यास सांगितले.

एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, जेव्हा लोकांनी गरबा सुरू ठेवला तेव्हा आणखी लोक त्यात सामील झाले, त्यानंतर जमावाने दगडफेक सुरू केली. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की त्यांच्यापैकी काही जण धारदार शस्त्रे, काठ्या आणि मंदिरावर दगडफेक करत होते.

Back to top button
error: Content is protected !!