महाराष्ट्र
Trending

जालन्यातील व्यापाऱ्यांवर जीएसटीच्या धाडी ! सणासुदीत सर्च ऑपरेशनमुळे व्यापाऱ्यांत धडकी !!

जालना, दि. 27 – ऐन दिवाळीत कपडा व्यापाऱ्यांवर जीएसटी पथकाने धाड टाकल्याने जालन्यातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी चार वाजता सुरु झालेली ही कारवाई रात्री ८ वाजेपर्यंत सुरुच होती. इन्कम टॅक्सनंतर आता जीएसटीच्या कारवाईमुळे जालना शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

आज, गुरुवारी  दुपारी चार वाजेच्या सुमारास 25 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चमु जालना शहरातील जुना मोंढा परिसरात धडकला. या परिसरातील सुमारे 5 ते 6 दुकानांत प्रवेश करून त्यांनी सर्च ऑपरेशन राबवले. एवढ्या मोठ्या स्वरुपात पडलेल्या धाडीची बातमी वार्याच्या वेगाने शहरभर पसरली. धास्तीने अनेक दुकानदारांनी आपले दुकान बंद करून कारवाईपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला.

काही वेळानंतर हे कर्मचारी व अधिकारी हे GST चे असल्याचे समजले. दुपारी चार वाजे पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत या दुकानांचे सर्च ऑपरेशन सुरुच होते. ही बातमी वाऱ्यासारख्या पसरलेल्याने जालना शहरातील बाजारपेठेत एकच धावपळ उडाली.

जालना शहरातील जुना मोंढ्यात 25 अधिकारी कर्मचारी दाखल झालेले असून रमेश हरिराम होलसेल क्लॉथ सेंटर, बंजारा केंद्र, आकाश गारमेंट सह अजून 5 ते 6 दुकानांचे सर्च ऑपरेशन सुरु होते.

या धाडसत्रामध्ये नेमके काय हाती लागले, याबात अधिकार्यांनी मौन बाळगले. कागदपत्रांची तपासणी चालू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!