महाराष्ट्र
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सुवर्णपदक -नागपूरसोबतचा सामना रोमहर्षक ठरला, ३- १ सेटने विजय

औरंगाबाद, दि.६: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ यांच्यासोबत झालेल्या रोमहर्षक सामन्यात ३-१ ने मात करीत व्हॉलीबॉलच्या सुवर्ण चषकावर नाव कोरले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या राज्य क्रीडा महोत्सवात पुरुषांच्या व्हॉलीबॉल गटातील अंतिम सामना खुपच रोमहर्षक झाला. या महोत्सवात चौथ्या दिवशी मंगळवारी (दि.सहा) सायंकाळी हा सामना झाला.
कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्यासह  प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर, सीआयडीचे सहाय्यक आयुक्त शशिकांत शिनगारे, डॉ. कल्पना झरीकर, डॉ.फुलचंद सलामपुरे,
स्पर्धाप्रमुख डॉ.एम.ए .बारी, कोच अभिजित सिंह दिख्खत, अशिष शुक्ला, गोविंद कदम, डॉ.संजय सांभाळकर, डॉ. उदय डोंगरे, डॉ. संदीप जगताप आदींसह क्रीडा रसिकांची पुर्ण सामना पाहण्यासाठी उपस्थिती होती.यजमान संघ पहिला सेट हरला. नंतरचे तीनही सेट यजमान संघाने जिंकून विजेतेपद पटकावले.

Back to top button
error: Content is protected !!