महाराष्ट्र
Trending

मुंबईत भरधाव फेरारी कार रेलिंगला धडकून तत्काळ उघडल्या ‘एअरबॅग्ज’

Story Highlights
  • पहाटे झालेल्या अपघातादरम्यान कारच्या 'एअरबॅग्ज' तत्काळ उघडण्यात आल्या आणि त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबई, 23 ऑक्टोबर – मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकजवळ एका वेगवान फेरारी कारने रस्त्याच्या रेलिंगला धडक दिल्याने त्याचे नुकसान झाले. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातादरम्यान कारच्या ‘एअरबॅग्ज’ तत्काळ उघडण्यात आल्या आणि त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

त्यांनी सांगितले की, वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात अन्य कोणत्याही वाहनाचे नुकसान झाले नाही.

कारचा चालक आणि कारमधील इतरांनी अपघाताची माहिती वांद्रे पोलीस ठाण्यात दिली, ज्याची डायरीत नोंद करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे पाच कोटी रुपयांची ही आलिशान कार एका खासगी कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, वांद्रे-वरळी सी लिंकवर एका वेगवान स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकलने (एसयूव्ही) अनेक वाहनांना धडक दिली आणि पाच जणांचा मृत्यू झाला.

Back to top button
error: Content is protected !!