महाराष्ट्र
Trending

नाशिकमध्ये 5.08 लाखांच्या बनावट नोटा जप्त, इडली विक्रेता अटकेत !

नाशिक, ८ ऑक्टोबर – महाराष्ट्रातील नाशिकमध्ये शुक्रवारी ५.०८ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या खोलीची झडती घेतली असता 500 रुपयांच्या 40 बनावट नोटा आणि 2000 रुपयांच्या 244 बनावट नोटा सापडल्या.

“आरोपी हा तामिळनाडूचा इडली विक्रेता आहे. जप्त केलेल्या बनावट भारतीय नोटा कोठे बनवल्या गेल्या आणि त्या बाजारात कशा पसरवल्या गेल्या याचा तपास सुरू आहे,” असे मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!