महाराष्ट्र
Trending

जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, सर्व 27 गेटमधून गोदापात्रात पाणी झेपावले ! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !!

औरंगाबाद, दि. 21 – जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाने राज्यात धूमाकूळ घातला असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आज सकाळी धरणातून विसर्ग वाढवला आहे. सध्या एकूण 84888 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

मागील काही दिवसांपासून परतीचा जोरदार पाऊस सुरु आहे. सध्या जायकवाडी धरण भरले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने साडेदहा वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले आहे. द्वार क्रमांक 1 ते 9 आज सकाळच्या सुमारास उघडले.

आता सध्या जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडे असून त्यातून गोदापात्रात पाणी सोडण्यात येत आहे. सध्या गोदावरी पात्रात सांडव्याद्वारे 75456 + 4716 + 4716= 84888 असा एकूण 84888 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) पैठण पाणी साठा एक नजर
पूर्ण संचय पातळी – 1522 फुट, 463.906 मी
सध्याची पाणी पातळी – 1522 फुट, 463.906 मी
जिवंत पाणी साठा – 2170.934 दलघमी, 76.66 टिएमसी
एकूण पाणी साठा – 2909.041 दलघमी, 102.72 टिएमसी
आवक – 60994

Back to top button
error: Content is protected !!