महाराष्ट्र
Trending

औरंगाबादसह अन्य शहरी भागात स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देश ! सुरुवातीला ग्रामीण भागाला वगळले !!

(Electricity) शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद, दि. 29 : महावितरणने आवश्यकतेनुसार सुरुवातीला शहरी भागातील ग्राहकांकडे स्मार्ट मीटर (Electricity) बसवावेत आणि या कामात यशस्वी झाल्यानंतरच ग्रामीण भागातही स्मार्ट मीटर बसविण्यात यावेत. याशिवाय स्मार्ट मीटर हे चांगल्या कंपनीचे आणि उच्च दर्जाचे असावेत, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण व महानिर्मितीचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत केल्या. (Electricity)

राज्याचे प्रधान सचिव (ऊर्जा) व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अनुक्रमे महापारेषण, महावितरण व महानिर्मिती कंपन्यांची माहिती सादर केली. (Electricity)

या बैठकीस महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा या कंपन्यांचे संचालक व म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण सोबतच महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा (Electricity) या चारही वीज कंपन्यांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी फडणवीस म्हणाले की, महावितरणने इतर कंपन्यांची थकीत देणी देण्यासाठी केंद्र शासनाला पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. याशिवाय फोटो मीटर रीडिंगचे फोटो मानवी हस्तक्षेप टाळून थेट सर्व्हर प्रणालीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत. (Electricity)

सौरऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांसोबत प्राधान्याने चर्चा कराव्यात. तसेच केंद्र सरकारने देशभरातील वीज वितरण कंपन्यांचे क्रमवारी जाहीर केली आहे, त्यात आपण कमी पडलो आहोत. या क्रमावारीत सुधारणेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिका-यांना केले. (Electricity)

 

Back to top button
error: Content is protected !!