महाराष्ट्र
Trending

वीज कंपनीचा अभियंता लाच घेताना पकडला ! दंडाची रक्कम कमी करण्यासाठी घेतले १८ हजार !!

भंडारा, दि. ७ – दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी सुरुवातीला आठ हजारांची मागणी करून पडताळणीत तब्बल १८ हजार घेताना वीज कंपनीचा अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अलगद अडकला.

हर्षवर्धन चिंधु लेदे असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर भंडारा जिल्ह्यातील पवनी पोलिस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे परमात्मा एक टाईल्स या नावाने गटु/ब्रिक्स बनवण्याची कंपनी आहे. तेथे बसविण्यात आलेले ईलेक्ट्रीक मीटरमधून त्यांचे नातेवाईकाचे टुव्हिलर रिपेरिंग च्या दुकाणामध्ये एक विद्युत लाईटची व्यवस्था केली होती.

यातील आरोपी यांनी दिनांक 07/10/2022 रोजी फिर्यादी यांची परमात्मा एक टाईल्स या गट्टू / ब्रिक्स कंपनी मध्ये जावून पंचनामा कार्यवाही केली. त्यानंतर 66070/- रु दंड केल्याची पावती फिर्यादिस दिली होती. तक्रारदार हे दंड सबंधाने आरोपी अभियंता हर्षवर्धन चिंधु लेदे यांना भेटण्यास गेले.

त्यावेळी आरोपी अभियंता हर्षवर्धन चिंधु लेदे यांनी दंड कमी करण्या करिताचा मोबदला म्हणून 8000/- रु लाच रकमेची मागणी केली. परंतु पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी अभियंता हर्षवर्धन चिंधु लेदे यांनी तक्रारदारास 18000/- रु लाचेची मागणी केली. ती लाच रक्कम सापळा कार्यवाही दरम्यान त्यांनी स्वीकारली. तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन आरोपी अभियंता हर्षवर्धन चिंधु लेदे यांच्या  विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!