महाराष्ट्र
Trending

अंगणवाडीसमोर सुरु असलेल्या क्रिकेटच्या डावात राडा, डोक्यात बॅट घातली ! कन्नड तालुक्यातील रिट्ठी मोहर्डातील युवकावर गुन्हा दाखल !!

कन्नड, दि. ८ – अंगणवाडीसमोर सुरु असलेल्या क्रिकेटच्या डावात राडा झाला. डोक्यात बॅट घालून जखमी केल्याप्रकरणी एकावर कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील रिट्ठी मोहर्डा येथे घडली.

शेख जावेद उर्फ जाबीर शेख रसीद (रा. रिट्टी मोहर्डा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात समीर खाँ ईसुफ खाँ पठाण (वय 25 वर्षे, व्यवसाय शेती रा. रीट्टी मोहर्डा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, 7/12/22 रोजी रात्री 9.00 वाजेच्या सुमारास समीर खाँ ईसुफ खाँ पठाण व गावातील शफिक मोहम्मद हनीफ पठाण, वशीम अय्युब पठाण, लीयाखत अली खाजा अली, रीहान खाँ फिरोज खाँ पठाण व इतर मुले अंगणवाडी शाळेसमोर लाईटच्या उजेडात क्रिकेट खेळत होते.

गावातील शेख जावेद उर्फ जाबीर शेख रसीद हा क्रिकेटच्या खेळामध्ये आला. त्याने क्रिकेटच्या बॉलला लाथ मारून फेकत असताना समीर खाँ ईसुफ खाँ पठाण हा त्यास म्हणाला की, तू आमचा बॉल का फेकतो ? असे म्हणताच त्याने शिवीगाळ केली व वसीम खाँ आय्युब खाँ पठाण याच्या हातातून बॅट घेवून समीर खाँ ईसुफ खाँ पठाण याच्या डोक्यात मारली.

त्यानंतर डाव्या हाताच्या करगळी वर मारून मुक्का मार दिला. जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मुलांनी हे भांडण सोडवले. त्यावेळी समीर खँ मसतान खाँ पठाण याच्या मोटार सायकलवर बसवून डॉ. छल्लानी याच्या दवाखान्यात उपचार कामी दाखल केले.

दरम्यान, समीर खाँ ईसुफ खाँ पठाण हा जखमी झाल्याचे कळताच वडील, भाऊ व इतर दवाखान्यात दाखल झाले. उपचार केल्यानंतर पोलीस स्टेशन गाठून रितसर तक्रार दिली. या तक्रारीवरून शेख जावेद उर्फ जाबीर शेख रसीद (रा. रिट्टी मोहर्डा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) याच्यावर कन्नड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!