महाराष्ट्र
Trending

पदवीधरमधून अर्जांची छानणी पूर्ण, वैध-अवैध अर्जांची यादी रविवारी घोषित होणार !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणूक

Story Highlights
  • खुल्या गटातून पाच तर आरक्षित गटातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. आजपर्यंत एकूण १२६ अर्ज दाखल झाले. यामध्ये खुल्या प्रवर्गातून सर्वांधिक ६४ अर्ज दाखल झाले.

औरंगाबाद, दि.५:  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पदवीधर गटातून दाखल अर्जांची छानणी प्रक्रिया शनिवारी दि.पाच घेण्यात आली. दहा जागांसाठी दाखल सर्व १२६ अर्जांची छानणी पूर्ण झाली असून वैध-अवैध उमेदवारी अर्जांची यादी रविवारी दि.सहा घोषित करण्यात येईल, अशी माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे व निवडणूक सल्लागार समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. समिती सदस्य डॉ.राम चव्हाण, डॉ.भारती गवळी, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.प्रवीण यन्नावार, उपकुलसचिव दिलीप भरड, डॉ.गणेश मंझा, डॉ.विष्णु क-हाळे, संजय कवडे, डॉ.प्रताप कलावंत, विजय मोरे आदींसह निवडणूक विभागातील अधिकारी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दुपारी १२ ते ३ या दरम्यान महात्मा फुले सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यासमंडळ आदी प्राधिकरणाच्या निवडणुकांचा कार्यक्रम कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणा-या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

यामध्ये खुल्या गटातून पाच तर आरक्षित गटातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. आजपर्यंत एकूण १२६ अर्ज दाखल झाले. यामध्ये खुल्या प्रवर्गातून सर्वांधिक ६४ अर्ज दाखल झाले. तर महिला – ८ अर्ज, अनूसुचित जाती -११, अनूसूचित जमाती – ७, इतर मागास वर्ग – ११ तर भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून – २५ अर्ज दाखल झाले आहेत. या प्रक्रियेसाठी निवडणूक विभागातील कक्षाधिकारी अर्जुन खांड्रे, संजय लांब, डॉ.श्रीकांत माने यांच्यासह सहकारी प्रयत्न केले.

Back to top button
error: Content is protected !!