महाराष्ट्र
Trending

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकासाठी पदवीधर प्रवर्गात पहिल्या दोन दिवसांत एकही अर्ज नाही !

-निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.भगवान साखळे यांची माहिती

Story Highlights
  • अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस ४ नोव्हेंबर असून २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

औरंगाबाद, दि.२८: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकासाठी पदवीधर प्रवर्गात
पहिल्या दोन दिवसांत एकही अर्ज विक्री अथवा दाखल झालेला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली. या प्रवर्गासाठी ३६ हजार ८८२ मतदारांची अंतिम यादी २६ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, त्याअंतर्गत शासनाने केलेले एकरुप परिनियम आणि शासन अधिसूचना दि.१७ मे २०१७ मधील तरतुदीनूसार विद्यापीठातील विविध अधिकारमंडळांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत.  कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने विविध निर्वाचक गणांच्या निवडणुका होणार असून यासाठी मतदार यादी तयार करण्यात आली आहे, यामध्ये पदवीधर पवर्गाची अंतिम मतदारयादी २६ ऑक्टोबर रोजी घोषित करण्यात आली.  तर २७ ऑक्टोबरपासून पदवीधर गटातील दहा जागांसाठी निवडक निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

२७ व २८ या दोन दिवसांत एकही अर्जाची विक्री झाली नाही अथवा दाखल देखील झालेला नाही. अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस ४ नोव्हेंबर असून २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

४५ अपिलांवर सुनावणी – अधिसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अपिलांवर मा.कुलगुरु डॉ .प्रमोद येवले यांच्या दालनात २ व ३ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.
यामध्ये १. प्राचार्यांचा गट (पूर्वकालिक मान्यताप्राप्त प्राचार्य व मान्यताप्राप्त परिसंस्थांचे संचालक) – ८ अपिल
२. व्यवस्थापन प्रतिनिधींचा गट (संलग्न किंवा स्वायत्त महाविद्यालयांच्या किंवा परिसंस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे प्रतिनिधी) – १५ अपिल
३. विद्यापीठ अध्यापकांचा गट – ० अपिल ४. अध्यापकांचा गट (संलग्न व स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांचे अध्यापक) – १५ अपिल ५. संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या विभागप्रमुखांचा गट – ७ अपिल आदींचा समावेश आहे.

दरम्यान,  यापुढे विद्यापीठ निवडणूक -२०२२ संदर्भातील जाहीर सूचना, परिपत्रक, अधिसूचना, मतदार याद्या तसेच निवडणूकीसंदर्भातील सर्व माहिती ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील, संदर्भात कुठल्याही वैयक्तिकरित्या पत्रव्यवहार केली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी कळविले आहे.

Back to top button
error: Content is protected !!