डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या १७ केंद्रावर मतदान, अधिसभेसाठी एकूण ७० उमेदवार !
औरंगाबाद, दि.९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा व विद्या परिषद या निवडणुकीसाठी चार जिल्हयातील १७ मतदान केंद्रावर शनिवारी (दि.१०) मतदान होणार आहे. निवडणुकीची संपुर्ण तयारी झाली असून ’वॉर रुम’ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.
विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद, अभ्यास मंडळ आदींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर गटातील दहा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. आता दुस-या टप्प्यातील अधिसभेच्या २९ तर विद्या परिषदेच्या ८ जागाची तसेच ३८ अभ्यासमंडळाची निवणूक प्रक्रिया मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
या सर्व जागांसाठी येत्या १० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ५ दरम्यान मतदान होणार आहे. मुख्य ईमारतीच्या मागे उभारण्यात आलेल्या निवडणूक कक्षातून केंद्रासाठी गाडया साहित्य पाठविण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे, निवडणुक समितीचे कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, डॉ.सतीश पाटील, डॉ.राम चव्हाण, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.नंदीता पाटील, डॉ.विनय लोमटे, डॉ.वैâलास पाथ्रीकर, डॉ.विष्णु क-हाळे, संजय कवडे, दिलीप भरड आदींची उपस्थिती होती.
आदींची उपस्थिती होती.
या निवडणुकीसाठी बीड, औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हयात प्रत्येकी पाच तर जालना जिल्हयात दोन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
जिल्हा निहाय मतदान केंद्र पुढीलप्रमाणे :-
औरंगाबाद : नाटयशास्त्र विभाग, दोन बूथ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), यशंवतराव चव्हाण महाविद्यालय (सिल्लोड), शिवाजी महाविद्यालय (कन्नड), विनायकराव पाटील महाविद्यालय (वैजापूर) व प्रतिष्ठान महाविद्यालय (पैठण),
बीड – केएसके महाविद्यालय (बीड), यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (अंबाजोगाई), भगवान महाविद्यालय (आष्टी), सिध्देश्वर महाविद्यालय (माजलगांव), बाबुराव आडसकर महाविद्यालय (केज)
उस्मानाबाद – विद्यापीठ उपपरिसर, तुळजाभवानी महाविद्यालय (तुळजापूर), ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय (कळंब), आदर्श महाविद्यालय (उमरगा), रा.गो.शिंदे महाविद्यालय (परांडा)
जालना – जेईएस महाविद्यालय (जालना) व मॉडेल कॉलेज (घनसांवगी) अशा १७ केंद्राचा समावेश आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांसाठी नजीकच्या केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवर्गनिहाय उमेदवार, मतदार :
या निवडणुकीत अधिसभेच्या २५ व विद्यापरिषदेच्या सहा जागांसाठीच प्रत्यक्ष मतदान होणार आहे. दोन्ही गटात मिळून तीन जागा बिनविरोध आल्या असून तीन जागा रिक्त राहिल्या आहेत. या निवडणुकीत प्रवर्गनिहाय निवडणूक आल्या जागा, प्रवर्ग निहाय उमेदवार, मतदारांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे :-
अधिसभा : विद्यापीठ शिक्षक – ३ जागा, ९ उमेदवार, १२८ मतदार
संस्थाचालक : ४ जागा, ८ उमेदवार, १६९ मतदार
प्राचार्य : ८ जागा, १४ उमेदवार, ७८ मतदार
महाविद्यालयीन शिक्षक : १० जागा, ३९ उमेदवार, २ हजार ५८७
तर विद्यापरिषदेच्या – ६ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात असून १ हजार २४३ मतदार आहेत. या प्रवर्गासाठी विद्यापीठ शिक्षक तसेच महाविदृयालयीन शिक्षक असे दोन्ही मतदार असणार आहेत. निवडणूक विभागाचे उपकुलसचिव डॉ.विष्णु क-हाळे, अर्जुन खांड्रे, संजय लांब यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
मतदानासाठी १४० जणांची नियुक्ती :
या निवडणुकीत १७ केंद्र तर १८ बूथ असणार आहेत. या प्रत्येक बूथवर निवडणूक केंद्राध्यक्षासह ७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १४० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट