महाराष्ट्र
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: तिसऱ्या दिवसानंतर एकही अर्ज दाखल नाही !

Story Highlights
  • पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणा-या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

औरंगाबाद, दि.१३: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने अधिसभा व विद्यापरिषदेचा निवडणूक कार्यक्रम सुरु झाला आहे. पहिल्या तीन दिवसांत एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

निवडणुकांचा कार्यक्रम कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणा-या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये खुल्या गटातून पाच तर आरक्षित गटातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे.

दुस-या टप्प्यात अधिसभेच्या २९ जागांसाठी उर्वरित गटातून मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये प्राचार्य व महाविद्यायीन प्राध्यापक गटातून प्रत्येकी दहा जागांसाठी तर संस्थाचालक गटातून सहा व विद्यापीठ शिक्षकातून ३ मतदान होणार आहे. तसेच विद्या परिषदेच्या आठ जागांसाठी मतदान होणार असून १९ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.

१० डिसेंबर रोजी मतदान तर १३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द झाली आहे. ११ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यात येत असून पहिल्या दोन दिवसांत एकही अर्ज दाखल झालेला नाही. तथापि विद्यापीठाच्या प्रकाशन विभागातून डॉ.राहुल जनार्दन म्हस्के (संस्थाचालक व महाविद्यालय शिक्षक गट) यांनी दोन अर्जांची खरेदी केली आहे. अधिसभा व विद्या परिषद निवडणुकासाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

यादी संदर्भात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे दाखल जवळपास ५० अपिलांवर सुनावणी घेण्यात येऊन स्पष्टीकरणासह निकाल घोषित करण्यात आला. त्यानंतर मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. पाच निर्वाचक गणांच्या निवडणुकासाठी मतदार यादी तयार करण्यात आली आहे, यामध्ये

१. प्राचार्यांचा गट (पूर्वकालिक मान्यताप्राप्त प्राचार्य व मान्यताप्राप्त परिसंस्थांचे संचालक) – ७८ मतदार

२. व्यवस्थापन प्रतिनिधींचा गट (संलग्न किंवा स्वायत्त महाविद्यालयांच्या किंवा परिसंस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे प्रतिनिधी) – १७० मतदार

३. विद्यापीठ अध्यापकांचा गट – १२८

४. अध्यापकांचा गट (संलग्न व स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांचे अध्यापक) – २ हजार ५८७ मतदार

५. संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या विभागप्रमुखांचा गट – १ हजार ४६७ मतदार आहेत. पहिल्या टप्प्यातील पदवीधर गटातून एकूण मतदारांची संख्या ३६ हजार ८८२ आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या ४ हजार ४३० आहे.

Back to top button
error: Content is protected !!