महाराष्ट्र
Trending

पदवीधरसाठी 90 उमेदवारांचे अर्ज वैध तर 9 अर्ज छानणीत बाद ! औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान ठरणार निर्णायक !

Story Highlights
  • कुलगुरु डॉ.प्रमोद यवेले यांच्या दालनात बुधवारी दि.नऊ अपीलांवर सुनावणी करण्यात येईल. तर १० नोव्हेंबर रोजी वैध-अवैध उमेदवारंची अंतिम यादी दि.११ रोजी सकाळी १०ः३० ते ५ दरम्यान अर्ज मागे घेणत येतील. ११ रोजी अंतिम उमेदवारी यादी, २६ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे.

औरंगाबाद, दि.७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पदवीधर गटातून ९० उमेदरावें अर्ज छाणनीत वैध ठरले आहेत. ९ जणांचे अर्ज अवैध ठरले असून या संदर्भात दाखल अपिलांवर येत्या बुधवारी मा.कुलगुरु यांच्याकडे सुनावणी घेण्यात येईल, अशी माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.भगवान साखळे यांनी दिली. दरम्यान, औरंगाबाद जिल्हयात सर्वाधिक मतदार असून हे मतदान निर्णायक ठरणार आहे.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणा-या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये खुल्या गटातून पाच तर आरक्षित गटातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. या निवडणूकीत दाखल झालेल्या अर्जांची शनिवारी छानणी होऊन रविवारी रात्री वैध-अवैध अमेदवारांची यादी घोषित करण्यात आली.

यामध्ये खुल्या प्रवर्गातून ४४ अर्ज वैध ठरले असून ४ अर्ज अवैध ठरले आहेत तर महिलांमध्ूान ७ पैकी २ तर भटके विमुक्त जाती अर्ज अवैध ठरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :- खुला प्रवर्ग – मोहम्मद अझरुद्दीन मोहम्मद सलीम, प्रकाश नामदेव वाघमारे, बेग एजाज साहेब, पंकज एकनाथ कुंटे, महिला – शिंदे मिनाक्षी प्रल्हादराव, मीनाक्षी श्रीधर भवर, भटके विमुक्त जाती-जमाती विजय रामधन आडे, ओम बाबासाहेब बडे मोहन माणिक जाधव या ९ उमेदवारांचा समावेश आहे.

दरम्यान, या यादीसंदर्भात अपील सोमवारी दि.सात दाखल झाले. कुलगुरु डॉ.प्रमोद यवेले यांच्या दालनात बुधवारी दि.नऊ अपीलांवर सुनावणी करण्यात येईल. तर १० नोव्हेंबर रोजी वैध-अवैध उमेदवारंची अंतिम यादी दि.११ रोजी सकाळी १०ः३० ते ५ दरम्यान अर्ज मागे घेणत येतील. ११ रोजी अंतिम उमेदवारी यादी, २६ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे.

प्रवर्गनिहाय दाखल अर्ज व वैध उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे-
अनुसूचित जाती – बनसोडे निवृत्ती विश्वनाथ, दुर्गे जगन रुपचंद, जोगदंड रोहित दिपक, कांबळे शिरीष मिलिंदराव, मगरे सुनिल यादवराव, सुरडकर अनिल सांडू,तायडे राहुल भिमराव, वाघमारे प्रकाश नामदेव (एकूण अर्ज -९)

अनुसूचित जमाती – बर्डे भागवत रामप्रसाद, डुकरे गजानन निवृत्ती, जामुनकर अविनाश हिरजी, माळी शहाजी विश्वनाथ, मोहम्मद अजारुद्दीन मोहम्मद सलीम, निकम सुनिल पुंडलिकराव, राठोड पुनम महेश (एकूण अर्ज -७)

वि.जा/भ.ज – आघाव विनोद संतोष, आंधळे आश्रूषा दगडू, भांगे दत्तात्रय सुंदरराव, भोसले संभाजी शिवाजीराव, गडदे विठ्ठल यशवंत, गुट्टे हनुमंत रघुनाथ, जाधव सुनील नामदेव, कदम अमर अंबादासराव, काळबंडे अशोक संपतराव, काळबंडे संजय संपतराव, कांबळे रररखमाजी भागुजी, काळे हर्षेमाला नरेंद्र, कांबळे रखमाजी भागुजी, फड चंद्रकांत शिवाजीराव, राठोड केशरचंद नारायण, सलामपुरे पुनम केशव, राठोड केशरचंद नारायण (एकूण अर्ज -१९)

इतर मागास वर्ग उमेदवार : जाधव संदीप दत्तात्रय, काळे राजीव आबाराव, काळे संतोष व्यंकटराव, खैरनार भारत रामदास, राऊत सुभाष किसनराव, सय्यद सज्जाद एकबाल, शेख अब्दुल मजिद अब्दुल मेहमूद मनियार, थोरात संतोष कारभारी, वाघ गणेश लक्ष्मण (एकूण अर्ज -९)

महिला उमेदवार – गायकवाड नंदा लक्ष्मणराव, काळे हर्षेमाला नरेंद्र, कुलकर्णी भाग्यश्री रमाकांतराव, पाटील पुनम वैâलास, तुपे ज्योती आसाराम (एकूण अर्ज -७)

खुला – अंबेवाडीकर निलेश सिद्राम, बाहेती अक्षय ऋषिकेश, बनसोडे पंकज बळीराम, भांगे दत्तात्रय सुंदरराव, भोसले संभाजी शिवाजीराव, भुतेकर रमेश खुशालराव, चक्रनारायण सागर दिवाकर, चव्हाण चंद्रकांत सोपानराव, धुमाळ संभाजी तुकाराम, धूपे सतिष असाराम, फंदे नितीन सत्यप्रेम, गवते सुनिल अकुंशराव, गवई विकास दत्तू, गुट्टे हनुमंत रघुनाथ, होके पाटील योगिता अशोकराव, इंगळे सुचिता चोखाजी, जाधव सुनील नामदेव, कदम अमर अंबादासराव, काळे हर्षेमाला नरेंद्र, काळे नरेंद्र हिरालाल, काळे सुनिल एकनाथराव, कांबळे रखमाजी भागुजी, खैरनार भारत रामदास, खोतकर पल्लवी आण्णासाहेब, मोटे प्रकाश नामदेवराव, नावंदर आशिष गोविंदप्रसाद, नवले लक्ष्मण उत्तमराव, निकम भागवत कुर्मादास, पवार विजय दादासाहेब, सलामपुरे पूनम केशव, सराफ तुकाराम शरदराव, सरकटे विलास कैलास, शेख अमर उस्मान, शेख जहूर खालेद, शिंदे मीनाक्षी प्रल्हादराव, शिंगटे अमोल सर्जेराव, सिद्दीकी मोहम्मद शोएब मोहम्मद रजीउद्दिन सिदीकी, सोमवंशी हरिदास भगवानराव, तडवी अनिस शरीफ, तुपे पंडित महीपती, ऊबाळे महेश भाऊराव, वाघ गणेश लक्ष्मण, वाघमारे परमेश्वर कचरु (एकूण अर्ज – ४४ अर्ज)

औरंगाबाद जिल्हयात सर्वाधिक मतदार
पदवीधर गटातून मतदानासाठी चार जिल्हयातून सर्वाधिक १७ हजार ७६५ मतदारांनी नोंदणी केली असून १६ मतदान केंद्र असणार आहेत. तर बीड जिल्हयात १२ हजार ५९३ असून १६ केंद्रावर, जालना जिल्हयात ३ हजार ९९३ असून ९ केंद्रावर तर उस्मानाबाद जिल्हयात २ हजार ५३१ मतदार असून १० केंद्रावर मतदान होईल. या निवडणूक एकुन मतदार ३६ हजार ८८२ असून चार जिल्हयातील ५१ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!