महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

यंदाचा दीक्षांत समारंभ संस्मरणीय ठरेल, शरद पवार, नितीन गडकरींना डी.लिट प्रदान करणार: कुलगुरु डॉ.प्रमोद येवले

६२ व्या दीक्षांत समारंभाची जय्यत तयारी, कुलपती भगतसिंह कोश्यारी, पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांची उपस्थिती

Story Highlights
  • यंदाचा हा सोहळा अत्यंत दिमाखदार व नियोजनबध्द करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने विविध ३० समित्यांची स्थापना करुन तयारी पूर्ण झाली आहे - कुलगुरु डॉ.प्रमोद येवले

औरंगाबाद,दि.१६: ’कोविड’च्या लाटेनंतर पहिल्यांदाच होत असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा यंदाचा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक व संस्मरणीय ठरेल, अशा विश्वास कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. महोत्सवाची संपूर्ण तयारी झाली असून सुमारे १ लाख ५ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ येत्या शनिवारी दि.१९ महाराष्ट्र भूषण ’सुपर कॉम्प्युटर’चे जनक विजय भटकर (कुलपती नालंदा विद्यापीठ) यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट प्रदान करण्यात येणार आहे.

या संदर्भात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद व्यवस्थापन परिषद कक्षात बुधवारी दि.१६ घेण्यात आली. यावेळी कुलगुरु यांच्यासह प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, परीक्षा मंडळ संचालक डॉ.गणेश मंझा, प्रसिध्दी समिती अध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, सचिव संजय शिंदे यांची उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरु मा.डॉ.प्रमोद येवले म्हणाले, ’कोविड’मुळे दोन वर्ष दीक्षांत समारंभ होऊ शकला नाही. यंदाचा हा सोहळा अत्यंत दिमाखदार व नियोजनबध्द करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने विविध ३० समित्यांची स्थापना करुन तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळयास प्रमुख मान्यवरांसह सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नोव्हेंबर/डिसेंबर २०२० ते मार्च/एप्रिल २०२१ या वर्षांतील पदवीचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे.

सोहळयाचे थेट प्रक्षेपण
६२ व्या दीक्षांत सोहळयाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच युटयूबसह विविध समाज माध्यमांवर करण्यात येईल. नाटयगृहात १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान हा सोहळा होणार आहे. नाटयगृहाच्या बाहेर देखील मंडप उभा करून मोठ्या पडद्यावर हा सोहळा प्रक्षेपित करण्यात येईल. या काळात मुख्य प्रवेशद्वार, नाटयगृह, छत्रपती शिवराय व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात सुभाभिकरण व विद्यूत रोषणाई करण्यात येणार आहे, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले आहे.

संलग्नित महाविद्यालयात पदवी व पदव्यूत्तर पदवी प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयातच पदवी प्रदान करण्यात येईल. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर महाविद्यालयातील समारंभ होतील. तर विद्यापीठ मुख्य परिसरात पदवी, पदव्यूत्तर पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी व एम.फिल पदवीचे वितरण सभारंमाच्या दिवशी परीक्षा विभागातील काउंटरवर पदवी वितरण प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

बारा वर्षांनंतर डि.लीट प्रदान समारंभ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आजपर्यंत १६ मान्यवरांना डी.लिट ने गौरविले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उद्योगपती मा.बद्रीनाथ बारवाले यांना डि.लिट प्रदान सोहळा बारा वर्षापूर्वी झाला. माजी-न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार ही प्रमुख पाहुणे तर तत्कालीन कुलगुरु डॉ.नागानाथ कोत्तापल्ले साहेळयाचे अध्यक्ष होते. बारा वर्षानंतर आता डि.लिट प्रदान सोहळा होत आहे.

विद्यापीठाने आजपर्यंत १६ मान्यवरांना डी.लिट ने गौरविले
यापूर्वी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (१९७०), स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ (१९७०), मा.गोविंदभाई श्रॉफ (१९७२), डॉ.के.एन.सेठना (१९७३), प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण (१९७९), शिक्षणमहर्षी डॉ.मामासाहेब जगदाळे (१९८०), शहनाई वादक बिस्मीलाखान (१९८०), अण्णासाहेब गुंजकर (१९८३), ज्येष्ठ नेते भाई माधवराव बागल (१९८३), डॉ.देविदास चव्हाण (१९८७), सेतु माधवराव पगडी (१९८७), माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (१९९९), एन.डी.पाटील (२०००), समाजसेवक बाबा आमटे (२००१), बी.आर.बारवले (२०१०) व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (२०१०) यांचा समावेश आहे.

एक लाख पदवीधरांची नोंदणी
यंदाच्या दीक्षात समारंभासाठी डिसेंबर २०२२ व एप्रिल २०२१ या सत्रातील पदवीधारकां पैकी १ लाख ५ हजार ४२७ जणांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीएचडी ५६५, एम फिल ०५, पदव्यूत्तर पदवी धारक २ हजार ४८ तर पदवीधारकांची संख्या १ लाख २ हजार ८०९ जणांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.गणेश मंझा यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!