- या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी वर्गाला होणार आहे.
मुंबई, दि. १९ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी – कर्मचारी वर्गाला होणार आहे. दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळी भेट म्हणून ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही श्री. चन्ने यांनी सांगितले.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट