7 व्या वेतन आयोगाचे दोन थकीत हप्ते शिक्षकांच्या खात्यावर जमा करा ! 500 रिक्त पदे दिवाळीपूर्वी पदोन्नतीने भरा !!
सत्कार प्रसंगी सीईओना शिक्षक संघटनांचे साकडे
औरंगाबाद, दि. 7- सातव्या वेतन आयोगाचे दोन थकीत हप्ते शिक्षकांच्या खात्यावर जमा करा, 500 रिक्त पदे दिवाळीपूर्वी पदोन्नतीने भरा या प्रमुख मागण्यांकडे नवनियुक्त सिईओ यांनी संघटनांना सकारात्मकता दाखवली. आदर्श शिक्षक समिती, शिक्षक परिषद, ग्रामसेवक संघटना, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी नुकतेच रुजू झालेले सीईओ विकास मिना यांचे त्यांच्या दालनात पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिक्षक संघटनांनी प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे साकडे घातले.
यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधले. मागण्यांचे निवेदन चर्चा करून देण्यात आले. मागील चौदा वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे प्रामुख्याने विस्तार अधिकारी पदोन्नतीला झालेला विलंब याचबरोबर केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर विषय शिक्षक, सुमारे पाचशे पदे रिक्त आहे.
ही सर्व पदे दिवाळीच्या सुटयापूर्वी पदोन्नतीने भरावी, तीन कोटी जमा असलेला शिक्षक- कर्मचारी कल्याण निधी जमा खर्च हिशोबाची चौकशी करून वर्गणीदार यांना व्याजासह परत करणे, निवड श्रेणी प्रस्ताव निकाली काढणे, 7 व्या वेतन आयोगाचे दोन थकीत हप्ते शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे, प्रलंबित सर्व पुरवणी देयके निकाली काढणे, सेवापुस्तिका पडताळणी करणे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जाणून घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मकता दाखवली. यावेळी शिक्षक परिषदचे जिल्हा अध्यक्ष श्रीराम बोचरे, दिलीप गोरे, जगन ढोके, गणेश सोनवणे, शिवाजी दांडगे, आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे, जयाजी भोसले, . बबिता नरोटे, ज्ञानेश्वर पठाडे, बाबूलाल राठोड, मनोहर पठे, अरविंद आडे यांची उपस्थिती होती
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट