शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला येणार फैसला !
मनी लाँड्रिंग प्रकरण
- उपनगरीय गोरेगाव भागातील पत्रा चाळच्या पुनर्विकासात आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना या वर्षी जुलैमध्ये अटक केली होती.
मुंबई, 2 नोव्हेंबर – मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन याचिकेवर मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी आपला निर्णय राखून ठेवला असून, 9 नोव्हेंबर रोजी निकाल सुनावणार असल्याचे सांगितले.
खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी ९ नोव्हेंबरपर्यंत वाढवली.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए)शी संबंधित खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी सांगितले की, ते सहआरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीन याचिकेवर 9 नोव्हेंबर रोजी निकाल देणार आहेत.
उपनगरीय गोरेगाव भागातील पत्रा चाळच्या पुनर्विकासात आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना या वर्षी जुलैमध्ये अटक केली होती.
सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून मध्य मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. त्यांनी गेल्या महिन्यात जामीन मागितला होता, त्यास ईडीने विरोध केला होता.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट