महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

उद्धव ठाकरेंना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा, मशाल चिन्हावर शिक्कामोर्तब !

शिवसेनेच्या गटाला 'मशाल' निवडणूक चिन्ह वाटपाच्या विरोधातील समता पक्षाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली

Story Highlights
  • याचिकाकर्त्या समता पक्षाची मान्यता 2004 मध्येच रद्द करण्यात आली होती आणि या चिन्हावर त्यांचा कोणताही अधिकार नाही

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर – शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह वाटप करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.

न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, याचिकाकर्त्या पक्षाची मान्यता 2004 मध्ये रद्द करण्यात आली होती आणि त्यांनी कोणताही अधिकार दाखवला नाही. समता पक्षाने ‘मशाल’ हे आपले निवडणूक चिन्ह असल्याचा दावा केला होता आणि याच चिन्हावर पक्षाने निवडणूक लढवली होती.

न्यायालयाने म्हटले, “याचिकाकर्त्याने निवडणूक चिन्हावर कोणताही अधिकार दाखवलेला नाही. न्यायालय या याचिकेवर विचार करण्याच्या बाजूने नाही. ती फेटाळली जाते.”

याचिकाकर्त्याने निवडणूक आयोगाच्या १० ऑक्टोबरच्या आदेशाला आव्हान दिले होते की, ‘मशाल’ हे राखीव चिन्ह आहे आणि ते शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देण्याआधी अधिसूचना जारी करायला हवी होती.

याचिकाकर्त्यांचे वकील कमलेश कुमार मिश्रा यांनी न्यायालयाला माहिती दिली की पक्षाने 2014 ची लोकसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढवली होती.

निवडणूक आयोगातर्फे उपस्थित असलेले वकील सिद्धांत कुमार यांनी वाटपाचा बचाव केला आणि सांगितले की, कायद्यानुसार, याचिकाकर्त्याने दावा केल्यानुसार, वाटप आदेश पारित करण्यापूर्वी कोणतीही अधिसूचना जारी करण्याची आवश्यकता नाही.

याचिकाकर्त्या पक्षाची मान्यता 2004 मध्येच रद्द करण्यात आली होती आणि या चिन्हावर त्यांचा कोणताही अधिकार नाही.

Back to top button
error: Content is protected !!