महाराष्ट्र
Trending

बिडकीन हद्दीतील तोंडोळी शिवारातील अत्याचार व दरोड्याचा तपास करणाऱ्या धाडसी पोलीस अधिकारी विशाल नेहुल, संतोष माने व जगदीश मोरेंचा सन्मान !

औरंगाबाद, दि. २५ – बिडकीन हद्दीतील तोंडोळी शिवारातील अत्याचार व दरोड्याचा तपास करणाऱ्या धाडसी पोलीस अधिकारी विशाल नेहुल, संतोष माने व जगदीश मोरेंचा आज सन्मान करण्यात आला. औरंगाबाद परिक्षेत्र कार्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित करुन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिलेले प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस महासंचालकांकडून त्यांना रोख बक्षीस जाहीर झाल्याने हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 19/10/2021 व 20/10/2021 च्या रात्री पोलीस ठाणे बिडकीन हद्दीतील तोंडोळी शिवारात फिर्यादी राहत असलेल्या शेतवस्तीवर अनोळखी 6 ते 7 आरोपीतांनी दरोडा टाकून फिर्यादीच्या दोन बहिनींवर लैंगीक अत्याचार करून चांदीचे दागीने, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण 70000/- रू किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला या आशयाच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे बिडकीन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर के. एम. मल्लीकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र यांनी घटनास्थळास भेट देवून तपासाबाबत मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणणेसाठी योग्य त्या सूचना दिल्या. त्यावरुन निमीत गोयल, तत्कालीन पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण, विशाल नेहुल, उप विभागीय पोलीस अधिकारी, पैठण, संतोष माने, सपोनि जगदीश मोरे, पोउपनि पोलीस ठाणे बिडीकन व त्याचे सहकाऱ्यांनी आरोपी प्रभु शामराव पवार व त्याच्या 6 साथीदारांना अटक करून गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला.

आरोपी अटक झाल्यानंतर के. एम. मल्लीकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांनी सदर गुन्हात मोक्का कलम अंतर्भुत करण्याची परवानगी दिली व गुन्हयाचा तपास विशाल नेहुल, उप विभागीय पोलीस अधिकारी, पैठण यांच्याकडे दिला.

सदर गुन्हयाचा चांगल्या प्रकारे तपास केल्याने गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ठ बक्षीस मिळणे करीता मे / 2022 मध्ये अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांचे मार्फतीने मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

पोलीस महासंचालक यांनी सदर गुन्हयांची निवड करुन विशाल नेहुल, उप विभागीय पोलीस अधिकारी, पैठण-5000/-, सपोनि / संतोष माने 2500, पोउपनि / जगदीश मोरे- 2500 पोलीस ठाणे बिडीकन असे 10000/- रु रोख बक्षीस जाहीर केल्याने आज दिनांक 25/11/2022 रोजी के. एम. मल्लीकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र यांनी मनिष कलवानीया, पोलीस अधीक्षक, यांच्या उपस्थितीत विशाल नेहुल, उप विभागीय पोलीस अधिकारी, पैठण, संतोष माने, सपोनि जगदीश मोरे, पोउपनि पोलीस ठाणे बिडीकन यांना औरंगाबाद परिक्षेत्र कार्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित करुन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिलेले प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Back to top button
error: Content is protected !!