महाराष्ट्र
Trending

बीड: एन्जटला अडीच लाख देऊन नवरी आणली, रात्रभर तिने आत्महत्येचे सोंग घेतले ! सकाळी महिलेसोबत पळून जात असताना नातेवाईकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन !!

बीड, दि. ७ – लग्न जमत नसल्याने एन्जटने मुलगी दाखवली. पसंतही पडली. अडीच लाख देऊन मुलीला लग्न करून आणलेही. परंतू रात्रभर तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. मला जाऊ द्या, अन्यथा मी एखाद्याची जीव घेईन आदी धमक्याही दिल्या. सकाळी एक महिली तिला घ्यायला आली. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलाच्या नातेवाईकांनी दोघींना पोलिसांच्या स्वाधीन करून फसलेल्या लग्नाची हकीकत सांगितली. याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून एजंटासह मुलीच्या नातेवाईकांवर बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोपट नवनाथ तळेकर (वय32वर्षे व्यवसाय शेती रा.घाटा पिंपरी ता. आष्टी जि. बीड.ह.मु. कबाडगल्ली, बीड) याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, तो सायकल मार्टचे दुकान चालवतो. पोपट तळेकरचे  लग्न झालेले नाही. सोयरीक येत नसल्याने त्याने त्याची बीड येथे दिलेली बहिण मंगल शंकर कुरुळे हीस मुलगी पाहण्यास सांगितले. बहिण व मेहुणे शंकर कुरुळे यांनी पोपट तळेकरच्या लग्नासाठी एजन्ट नाना पाटील नुरसारे याच्या सोबत संपर्क साधला.

त्याला कबाड गल्ली बीड येथे मेव्हुणे शंकर कुरुळे यांच्या घरी दिनांक 03/12/2022 रोजी बोलावून घेतले. तेथे पोपट तळेकर व त्याची बहीण मंगल, मेव्हणे शंकर यांच्यामध्ये बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पोपट तळेकर यास मुलीचे फोटो दाखवण्यात आले. मुलगी पसंत झाली. त्यावेळी एजंट नाना पाटील नुरसारे म्हणाला की, मुलीच्या आई व भावाला 2,50,000 रुपये द्यावे लागतील.

अगोदर पैसे द्यावे लागतील. मग दुसर्या दिवशी लग्न लावण्यात येईल. ज्या मुलीसोबत तुमचे लग्न लावून द्यायचे आहे ती मुलगी सिद्धार्थ नगर औंढा नागनाथ जि. हिंगोली येथील असून तिच्या वडीलाचे नाव बालाजी शंकर माने असे सांगितले. ते मयत असल्याचे सांगून आईचे नाव मनकरणा बालाजी माने, भाऊ आकाश  (सर्व रा. सिद्धार्थ नगर ऑढा नागनाथ जि. हिंगोली) असे सांगितले.

तेव्हा पोपट तळेकर याने त्यांना या मोबदल्यात 2,50,000/- रूपये देण्याचे कबुल केले. त्यानंतर तो एजंट निघून घेला. दिनांक 04/12/2022 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 वाजेच्या दरम्यान एजंट नाना पाटील नुरसारे याने बहिणीच्या मैत्रीणीच्या मोबाईलवर फोन केला व त्यांनी सांगितले की तुमच्या मैत्रीनीचा भाऊ पोपट नवनाथ तळेकर यांना मी फोटो दाखविलेली मुलगी पसंत आहे. त्याचे लग्न त्या मुलीशी लावुन देण्यासाठी दिनांक 05/12/2022 रोजी वसमत जि. हिंगोली येथे घेवून या. सोबत ठरलेले 2,50,000/-रूपये घेवून या असे सांगितले. अशी माहीती बहिणीच्या मैत्रीणीने मंगल हीस सांगितली.

त्यानंतर बहीण मंगल, मेव्हुने शंकर यांच्यामध्ये बैठक झाली. पोपट तळेकर व नातेवाईक दिनांक 05/12/2022 रोजी सकाळी अंदाजे 08.00 ते 08.30 वाजेच्या दरम्यान जाण्याचे ठरवले. सोबत बहिणीची मैत्रीण त्रिशाला यांना घेवून जाण्याचे ठरले. दिनांक 05/12/2022 रोजी सकाळी 08.30 वाजेच्या सुमारास पोपट तळेकर, मेव्हणे शंकर, बहिण मंगल, बहिणीची मैत्रीण त्रिशाला खाजगी वाहनाने वसमतकडे निघाले. वसमत येथे 12.30 वाजता ते पोहचले.

वसमत येथे कोर्टात जावून वधू मुलगी, मुलीची आई मनकरणा बालाजी माने, भाऊ आकाश बालाजी माने, एजन्ट नाना पाटील नुरसारे मध्येस्थी करणारा विनोद खिल्लारे, बालाजी आलेकर, यांच्या समक्ष 100 रुपयांच्या नोटरी बॉन्डवर विवाह करारनामा शपतपत्र करून घेतले. त्यानुसार लग्न पार पडले.

अर्धा तासाने नाना पाटील नुरसारे यांनी सांगितलेल्या चष्म्याच्या दुकानावर ज्ञानेश्वर कुषारे यांच्या अकाउंटवर मेव्हणे शंकर कुरुळे यांच्या मोबाईलवरून फोन पे व्दारे 70,000/- रुपये ट्रान्सफर केले व विनोद खिल्लारे व बालाजी भालेकर यांना 1,80,000/- रुपये नगदी दिले. त्यानंतर पोपट तळेकर, वधू मुलगी, तिचा भाऊ आकाश, आई मनकरणा यांच्या संमतीने गाडीत बसुन कबाडगल्ली बीड येथे रात्री 11.30 वाजता पोहोचले. दिनांक 06/12/2022 रोजी रात्री 01.00 वाजेच्या सुमारास वधू मुलगी ही पोपट तळेकर, मेव्हणे व बहिण यांना म्हणाली की, मला येथे तुमच्या जवळ राहायचे नाही.

मला येथून जायचे आहे. तुम्ही मला इथून सोडून दिले नाही तर मी आत्महत्या करीन नाहीतर तुमच्या घरातील एखाद्याला जिवे मारून टाकील अशी धमकी दिली. रात्रभर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. पोपट तळेकर व नातेवाईक रात्रभर जागे राहीले. सकाळी मेव्हणे शंकर यांच्या फोनवर मीना बळीराम बागल या महिलेचा फोन आला. मी बीड येथे बसस्टँडवर आले आहे. तुम्ही मुलीला बस सटँडवर घेवून या. मी तिला घेऊन जाणार आहे, असे ती म्हणाली.

यावर मेव्हणे शंकर यांनी सांगितले की, आम्ही मुलीला बस स्टँडवर घेऊन येणार नाही. काही वेळाने पत्ता शोधत ती बहिणीचे घरी सकाळी 10.30 वाजता आली व मुलीस सोबत नेत असल्याचे पोपट तळेकर व त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या दोघींना पकडून पोलीस स्टेनला घेवून गेले.

याप्रकरणी पोपट तळेकर याने दिलेल्या तक्रारीवरून  एजन्ट नाना पाटील नुरसारे, विनोद खिल्लारे, बालाजी भालेकर, मुलीची आई मनकरणा माने, भाऊ आकाश माने व मुलीला सोबत घेऊन जाण्यासाठी आलेली मीना बळीराम बागल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2,50,000/- रुपये घेवून लग्न करून देण्याचे नाटक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!