बाबा पेट्रोलपंप ते लोखंडी पुलादरम्यान गस्तीवरील सात जवानांची नजर चुकवून मास्टरमाईंड चोरट्याने चंदनाचे झाड शिताफिने कापून नेले !
सुरज जोशी, औरंगाबाद
बाबा पेट्रोलपंप ते लोखंडी पुलादरम्यान गस्तीवरील सात जवानांची नजर चुकवून मास्टरमाईंड चोरट्याने चंदनाचे झाड मोठ्या शिताफिने कापून नेले. लोखंडी पुल ते बाबा पंप या रस्त्याच्या डाव्या बाजुच्या झाडीधील चंदनाचे झाड चोरट्यांनी लंपास केले. फांद्या तेथेच सोडून फक्त खोड चोरून नेले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
औरंगाबाद येथील मिल्ट्री कॅम्प येथील नाईक सुभेदार एम गोपाल कृष्णन पी माडास्वामी (वय 44वर्षे, नौकरी रा मिल्ट्री कॅम्प औरंगाबाद) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, मिल्ट्री कॅम्पमधील युनिट क्र 321 मिडियम रेजिमेन्ट यामध्ये त्यांच्याकडे पडेगाव ते बाबा पंप पर्यंतचा डाव्या बाजुचा पूर्ण परिसर देखरेखी खाली आहे.
या भागात एम गोपाल कृष्णन पी माडास्वामी यांची पेट्रोलिंग असते. यासंपूर्ण भागात 23/11/2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.30 वाजे पर्यंत एम गोपाल कृष्णन पी माडास्वामी यांचे सहकारी यांनी पायी पेट्रोलिंग केली. त्यावेळी सर्व काही व्यवस्थीत होते.
दि 24/11/2022रोजी एम गोपाल कृष्णन पी माडास्वामी यांची ड्युटी वरिल भागात दुपारी 2.30 ते 6.30वा अशी असताना एम गोपाल कृष्णन पी माडास्वामी हे त्यांचे सहा सहकारी सोबत लोंखडी पुल ते बाबा पंप या रस्त्याच्या डाव्या बाजुच्या झाडीमध्ये पायी पेट्रोलिंग करित होते.
दरम्यान, संध्याकाळी 4.30वाजेच्या सुमारास सदर झाडी मधील असलेले चंदनाचे झाड बुडा पासून तोडलेले दिसून आले. सदर ठिकाणी फक्त फांद्या पडलेल्या असून झाडाचे संपूर्ण खोड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना इरफान खान करत आहेत.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट