महाराष्ट्र
Trending

औरंगाबाद उस्मानपुरा पोलिस स्टेशनचा पोलिस नाईक लाच घेताना सापळ्यात अडकला ! फायनान्स कंपनीने मारहाण करून ओढून नेलेल्या दुचाकीच्या गुन्ह्यासंदर्भात कारवाईसाठी घेतले ५ हजार !!

औरंगाबाद, दि. २३ – फायनान्स कंपनीने मारहाण करून ओढून नेलेल्या दुचाकीच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईकला रंगेहात पकडण्यात आले. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

प्रकाश धोंडीबा सोनवणे (वय 49 , पद पोलीस नाईक, नेमणूक- उस्मानपुरा पोलीस स्टेशन औरंगाबाद, शहर) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांचे दुचाकी वाहन बजाज फायनान्स कंपनीने ओढून नेले आहे. कर्जाचे हप्ते थकवल्याने तक्रारदरांना मारहाण करून त्यांची दुचाकी घेऊन गेले आहेत. त्याबाबत तक्रारदरांनी उस्मानपुरा येथे लेखी तक्रार केली.

त्या तक्रार अर्जावर करवाई करून तक्रारदार यांना दुचाकी परत मिळवून देण्यासाठी रुपये 5000/- पंच साक्षीदार समक्ष दिनांक 17/11/2022, आणि 18/11/2022 लाच मागणी केली. त्यानंतर त्यांनी स्वतः दिनांक 24/11/2022 रोजी लाच स्वीकारली.

ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, मारूती पंडित, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, सापळा पथक पोलीस अंमलदार सुनील पाटील, राजेंद्र जोशी, विलास चव्हाण, अशोक नागरगोजे, चालक चांगदेव बागुल ला.प्र.वि,औरंगाबाद यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!