महाराष्ट्र
Trending

औरंगाबादेत दोन गटांत राडा, न्यू पहाडसिंगपुरा परिसरातील नविन सिमेन्ट रोडवरून ट्रक नेल्यावरून पाच जण आपसात भिडले !

ओरंगाबाद, दि. ६ – न्यू पहाडसिंगपुरा परिसरातील नविन सिमेन्ट रोडवरून ट्रक नेल्यावरून पाच जण आपसात भिडले. जोर-जोरात ओरडून आपसात झुंज करून मारामारी करीत असताना पोलिस पथक पोहोचले. यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पाच जणांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिक रफियोद्दीन पटेल (वय 38 वर्षे), शेख आबेज शेख युसुफ (30), मोहम्मद रईस मोहम्मद याकुब (34), सुनील सुंदरलाल बागवाले (48), आदित्य धर्मराज बागवाले (19, सर्व रा न्यू पहाडसिंगपुरा औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोना संजय रामसिंग ठाकुर यांनी दिलेली माहिती अशी की, दि 05/12/2022 रोजी 21.00 ते दि 06/12/2022 रोजी 09.00 वाजेपर्यंत त्यांची व सोबत पोह शेख रहीम ड्युटीवर होते.

रोजेबाग परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना 22.30 वाजेच्या सुमारास त्यांना कळले की, न्यू पहाडसिंगपुरा, इब्राहिम शहा मस्जित जवळ भांडण चालू आहे. लोक जमा झालेले आहे. ही माहीती मिळाल्याने पोना संजय रामसिंग ठाकुर व सहकारी त्या ठिकाणी 22.45 वाजेच्या सुमारास पोहचले.

लेणी रोड न्यू पहाडसिंगपुरा येथील सलिम किराना दुकाना जवळ काही लोक हे गल्लीतील नविन सिमेन्ट रोडवरून ट्रक नेल्याच्या कारणावरून जोर-जोरात आरडा ओरडा करून आपसात झुंज करून मारामारी करीत होते.

पोना संजय रामसिंग ठाकुर व पोलिस पथकाने त्यांचे भांडण सोडवले व पो.स्टेला आणून त्यांना त्यांचे नाव विचारले. त्यांनी त्यांची नावे अनिक रफियोद्दीन पटेल (वय 38 वर्षे), शेख आबेज शेख युसुफ (30), मोहम्मद रईस मोहम्मद याकुब (34), सुनील सुंदरलाल बागवाले (48), आदित्य धर्मराज बागवाले (19, सर्व रा न्यू पहाडसिंगपुरा औरंगाबाद) असे सांगितले. या पाच जणांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि भालेराव करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!