महाराष्ट्र

औरंगाबाद महापालिकेचा रेड्डी कंपनीला दणका ! कुंड्यातील कचरा रस्त्यावर, 25 हजारांचा दंड !!

उप आयुक्त जाधव यांनी झोन 8 मध्ये घेतला स्वच्छता विषयक कामांचा आढावा

औरंगाबाद, दि 17- शहरातला कचरा उचलणाच्या रेड्डी कंपनीला 25,000 रुपये दंड लावण्याचे आदेश आज उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख सोमनाथ जाधव यांनी आज दिले.

आज दि 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 07 वाजता सातारा-देवलाई परिसर झोन क्रमांक 08 येथे स्वछता विषयक कामांचा आढावा घेतला. यावेळी उप आयुक्त तथा सहाय्यक आयुक्त संतोष टेंगळे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव आदींची उपस्थिती होती.

पाहणी दरम्यान जाधव यांच्या असे निदर्शनास आले की कचरा कुंडीतला कचरा उचलण्यासाठी रेड्डी कंपनीतर्फे गाडी उपलब्ध करण्यात येत नाही. यावर नाराजी व्यक्त करून त्यांनी कंपनीला 25,000 रुपये दंड लावण्याचे आदेश टेंगळे यांना दिले.

याशिवाय जाधव यांनी खलील प्रमाणे निर्देश दिले.
1) रेड्डी कंपनीला घंटागाड्यांवर हेल्पर म्हणून महानगरपालिकेच्या स्थापनेवरील 26 मजूर देण्यात आले होते त्यांना काढून रोडची साफसफाई च्या कामावर लावून घेणे आणि घंटागाड्यांवर रेड्डी कंपनीने त्यांचे मनुष्यबळ लावावे

2) कचरा वर्गीकरण ची जबाबदारी रेड्डी कंपनीची आहे. कंपनी त्यांचे काम करावे तसेच कचरा ट्रान्सफर स्टेशन कंपनीने स्वच्छ ठेवावे .

3) ज्या घंटागाड्यांचे काम सकाळी 11 वाजता संपून जाते अशा गाड्यांना प्रभागातील इतर भागात दोन वाजेपर्यंत लावणे.

4) अब्रार कॉलोनी, शंभू नगर आणि रशीद मामु कॉम्प्लेक्स जवळ नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये यासाठी नल्यावरच्या पुलांवर जाळी बसविणे.

याशिवाय जाधव यांनी कांचनवाडी ते बीड बायपास हा संपूर्ण रस्त्यावर स्वीपिंग मशीन लावून रस्त्यातली आणि दुभाजकाला खेटून माती उचलण्याचे निर्देश दिले तसेच शहानुर मिया दर्गा चौक हा व्यवसायिक भाग असून येथे रात्र पातळीत स्वीपिंग करण्याचे निर्देश दिले यावेळी त्यांनी नाईट स्वीपिंगचा आढावा देखील घेतला. यावेळी त्यांनी बजाज हॉस्पिटल ते दर्गा चौक उड्डाण पुलाच्या खालच्या भाग आणि आमदार रोड या भागात स्वच्छता कामांच्या आढावा घेतला.

Back to top button
error: Content is protected !!