महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

पिंपळगाव दिवशी शिवारातील दगडा फार्म हाऊसवरील जुगाराचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त ! सात आरोपींच्या ताब्यातून 18112000/ रुपयांचा मुद्देमाल जप्त !

पोलिस ठाणे शिल्लेगाव हद्दीत कारवाई,

औरंगाबाद, दि. 4 – पिंपळगाव दिवशी शिवारातील दगडा फार्म हाऊसवरील जुगाराचा अड्डा पोलिसांनीू उद्ध्वस्त केला. सात आरोपींच्या ताब्यातून 18112000/ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जुगार्यांचे धाबे दणाणले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिस ठाणे शिल्लेगाव हद्दीत  ही कारवाई केली.

मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना गोपनीय बातमीदारा मार्फत शिल्लेगाव हद्दीतील दगडा फार्म हाऊस येथे अवैधरित्या जुगार अड्डा चालू असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलीस अधीक्षक यांनी स्थागुशा पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे व त्यांच्या पथकाला तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खात्री करून छापा मारण्याचे सूचना देऊन रवाना केले.

यावरुन प्रकाश बेले, उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थागुशा पथकांने कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी जाणारे रोडवर मनोजकुमार दगडा यांचे दिवशी शिवारातील शेतातील फार्म हाऊसवर पडताळणी केली असता तेथे काही जण हे पत्यावर रुपये लावून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवित असल्याचे समजले.

यावरून पंचासमक्ष रात्री ०३:३० वाजता मनोजकुमार दगडा यांच्या दिवशी (ता. गंगापूर) शिवारातील फॉर्म हाऊस येथे अचानक छापा टाकला. तेथील पहिल्या मजल्याच्या गॅलरीमध्ये झन्ना -मन्ना जुगार खेळणा-या लोकांना ताब्यात व विश्वसात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता ती पुढील प्रमाणे सांगितली आहे.

१) पुनमसिंग सुनील ठाकुर वय ३३ वर्षे रा. रांजणगाव शेषपुंजी ता. जि. औरंगाबाद
२) गणेश रावसाहेब पोटे वय २८ वर्ष रा. नागेश्वरवाडी, औरंगाबाद
३) कुणाल दिलीपकुमार बाकलीवाल वय ३७ वर्ष रा. शहागंज, औरंगाबाद

४) अभिषेक वसंतकुमार गांधी वय ३६ वर्ष रा. चिकलठाणा औरंगाबाद
5) संदीप सुधीर लिंगायत वय ४७ वर्ष रा. बन्सीलाल नगर औरंगाबाद
६) विशाल सुरेश परदेशी वय ३३ वर्ष रा पदमपुरा, औरंगाबाद

७) मनोजकुमार फुलचंद दगडा वय ४६ वर्ष रा. सिडको एन-९ छायानगर, औरंगाबाद हे तेथे मिळुन आले आहेत.
त्याचे ताब्यातून २५,६०,०००/- रुपये रोख तसेच पाच वाहने चारचाकी, मोबाईल हॅन्डसेट ०७, जुगाराचे साहित्य असा एकूण १,८१,१२,०००/- ( एक कोटी, ऐक्यंशी लाख बारा हजार रुपये मात्र) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या आरोपीविरुध्द पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे शिल्लेगाव हे करित आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश बेले, उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगापूर, स्थागुशा चे पोनि रामेश्वर रेंगे, पो.उप.नि. प्रदीप ठुबे, पोलीस अंमलदार लहु थोटे, श्रीमंत भालेराव, किरण गोरे, गणेश गांगवे, विजय धुमाळ, उमेश बकले, ज्ञानेश्वर मेटे, आनंद घाटेश्वर यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!