महाराष्ट्र
Trending

जिल्हाधिकारीपदाची सूत्रे आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतली ! मजिठीया वेतन आयोगासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशानंतरही अनाठायी प्रश्न उपस्थित केल्याने सुनील चव्हाणांची कारकीर्द ठरली वादग्रस्त !!

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार - आस्तिक कुमार पाण्डेय

Story Highlights
  • काही कामे वगळता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी चांगले काम केले आहे. खासकरून कोविड काळातील परिस्थिती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली

औरंगाबाद, दि. 14  : श्रमिक पत्रकार कायदा कलम 17 (3) (1) कायद्यास आधीन राहून व मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार सहाय्यक कामगार आयुक्त यांनी जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्रावर अनाठायी प्रश्न उपस्थित करून तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला होता. सर्वोच्च न्यायालय (दिल्ली), उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ व कामगार न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही चाल-ढकल करणे, विलंब लावणे व अधिकार नसतानाही अनाठायी प्रश्न उपस्थित करून चव्हाण यांची कारकीर्द अखेरच्या टप्प्यात वादग्रस्त ठरली होती. आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी वरिष्ठ पत्रकारांनी त्यांच्या मंत्रालय स्तरावर तक्रारी केल्याने प्रकरण चांगलेच तापले होते. यानंतर या प्रकरणात चव्हाण यांनी ताकही फुंकून पिले. दरम्यान, काही कामे वगळता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी चांगले काम केले आहे. खासकरून कोविड काळातील परिस्थिती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली.

सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढणारे वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे, सुरज जोशी आणि विजय वानखडे यांचे हे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले.

मजीठिया वेतन आयोग प्रकरणी वसुली प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी writ pettion no 5605/5606/05607/56050/2021 या क्रमांकांच्या एकूण चार रिट याचिकेद्वारे दिले होते. हा आदेश प्राप्त होताच सहाय्यक कामगार आयुक्त यांनी श्रमिक पत्रकार कायदा कलम 17 (3) (1) नुसार 9/5/2022 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या नावे वसुली प्रमाणपत्र जारी केले होते.

मात्र, निवासी उप जिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने याप्रकरणी काही अनाठायी प्रश्न/हरकती उपस्थित केल्या होत्या. चव्हाण यांना असे अनाठायी प्रश्न उपस्थित करण्याचे कुठलेही कायदेशीर अधिकार नव्हते. विषेश म्हणजे चव्हाण यांनी जे अनाठायी प्रश्न उपस्थित केले होते त्या सर्व प्रश्नांवर मा. कामगार न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला होता. आणि त्यानंतर मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने writ pettion no 5605/5606/05607/56050/2021 या क्रमांकांच्या एकूण चार रिट याचिकेद्वारे मा. सहाय्यक कामगार आयुक्त पडीयाल यांना रिकव्हरी प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकार दिले होते.

त्यानुसार श्रमिक पत्रकार कायद्यान्वये वसुली प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वसुली कार्यवाही/कारवाई त्वरित कार्यान्वित करणे कायदेशी बंधनकारक होते. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पदाचा दुरुपयोग करून या प्रक्रियेला विलंब होईल अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करून खोडा घातला होता. विषेश म्हणजे ज्या दिवशी अनाठायी प्रश्न उपस्थित केले त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी कसुरदार कंपनीच्या कर्यालयाला सदिच्छा भेट देऊन सत्कार स्वीकारला होता. याचा सविस्तर वृत्तांत भास्करविश्व मीडियाने सचित्र दिला होता.

जिल्हाधिकारी यांनी कोणत्या कार्यालयाला भेट द्यावी आणि कोणत्या कार्यालयाला भेट देऊ नये हा सर्वस्वी अधिकार जिल्हाधिकारी यांचा आहे. मात्र, ज्या कंपनीकडून थकबाकी वसुली करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत त्याच कंपनीवर जप्तीची कार्यवाही करण्याऐवजी ते त्या कंपनीच्या कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात. आणि दुसर्या दिवशी अधिकार नसताना अनाठायी प्रश्न उपस्थित करतात, हा प्रकार नुसताच संशयास्पद नाही तर पदाचा दुरुपयोग आणि मा. न्यायालयाचा अवमान यात मोडणारा आहे. परंतू पत्रकारांची लढाई ही व्यवस्थापनाशी आहे तत्कालीन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी एक प्रकारे व्यवस्थापनाला फायदा पोहचेल अशी बेकायदेशीर प्रक्रिया राबवल्याचा आरोप पत्रकारांनी केला होता. त्यानंतर चव्हाण यांनी या प्रकरणापासून दूर राहणे पसंत केले आणि प्रक्रिया पुढे सुरु झाली. यासर्व प्रक्रियेत पत्रकारांचा हक्काचा पगार (रिकव्हरी) मिळण्यास/कोर्टात जमा होण्यास विलंब झाला.

दरम्यान, मावळते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पदभार स्वीकारला. छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेंतर्गत पाण्डेय यांनी वि‍विध विकासकामे, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम केलेले आहे. तसेच काही कामे वगळता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही चांगले काम केले आहे. खासकरून कोविड काळातील परिस्थिती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली.

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार – आस्तिककुमार पांडेय

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान आदींसह शेतकरी आत्महत्या रोखणे, पर्यटन विकास, जागतिक पातळीवर पैठणी, हिमरू आणि बिद्री कलेची निर्यात आदींवर लक्ष केंद्रीत करणार तसेच शासकीय योजनाची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय म्हणाले.

मावळते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज श्री.पांडेय यांनी पदभार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. ग्रामीण भागात मुलभूत सुविधा पुरविणे. ग्रामीण भागाचा विकास करणे, यावर विशेष लक्ष राहणार आहे. सर्वसामान्यांना अपेक्ष‍ित असणारे हक्काचे जिल्हाधिकारी म्हणून सामान्य नागरिकांच्या सर्व समस्या सोडवणुकीसाठी प्राधान्य राहणार असल्याचेही श्री. पांडेय म्हणाले.

रखडलेले उपक्रम, योजना, प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नपूर्वक कार्य करून या प्रकल्पांना गती देणार असल्याचेही ते म्हणाले. यासह छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करणे, नवीन पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे, खाम आणि सुकना नदीचे पुनर्जीवन करणे, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास करणे, जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी जनजागृतीवर भर देणे, या रोगावर नियंत्रण यावे, त्याचा प्रसार होणार नाही यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, पर्यटनासह उद्योग विकासाला चालना देण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्यावर भर देऊन जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे श्री. पांडेय यांनी आवर्जून सां‍गितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार श्री. पांडेय यांनी घेण्यापूर्वी अकोला, बीड या ठिकाणीही ते जिल्हाधिकारी होते. तसेच 2019 ते 2022 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेंतर्गत त्यांनी वि‍विध विकासकामे, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम केलेले आहे.

Back to top button
error: Content is protected !!