महाराष्ट्र
Trending

विद्यापीठ व महाविद्यालयांतील रिक्त आठ हजार पदांपैकी २ हजार ८८ जागा भरण्यास मान्यता !

उच्चशिक्षण मंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद, प्राध्यापक भरतीसह अनेक विषयांवर चर्चा

औरंगाबाद, दि.९ : राज्यातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील रिक्त आठ हजार पदांपैकी २ हजार ८८ जागा भरण्यास मान्यता दिली आहे. या भरतीनतंर आढावा घेऊन जागा भरतीस मान्यता देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास मा.ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी दि.९ भेट देऊन विविध उपक्रमांचे उद्घाटन केले. संतपीठाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा झाल्यानंतर विद्यापीठातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय व महात्मा फुले पुतळयास पुष्पहार अर्पण केला.

यानंतर त्यांना लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेस चंद्रकांत पाटील माहिती दिली. संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेले अभ्यासक्रम, संशोधन याबद्दलची माहिती संचालक डॉ.भगवान साखळे यांनी दिली. तर विद्यापीठाच्यावतीने या संस्थेच्या स्थापनेमागची संकल्पना व आगामी विस्तार कार्य याबद्दलची माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि.९) संवाद साधला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे आदींची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. द्यिार्थ्यांच्या प्रश्नांना मंत्री महोदयांनी दिलाखुलास उत्तरे दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ’सारथी’च्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणीपासून छात्रवृत्ती देणे, उच्च शिक्षणाचा नवीन आकृतीबंध मातृभाषेतून शिक्षण यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. मा.ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व प्रश्नांना दिलाखुलास उत्तरे दिली.

विद्यापीठाच्यावतीने कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय सल्लागार समितीवर सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल किशोर शितोळे यांच्या चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चंद्रकांत पाटलांनी घेतला तास
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शिक्षकाच्या भुमिकेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय जीवनापासून ते कौटूंबिक जीवन तसेच राजकीय जीवनातील वाटचालीबद्दल त्यांनी कथन केले. हशा व टाळयांची दाद घेत तंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांचा तास घेतला.

Back to top button
error: Content is protected !!