महाराष्ट्र
Trending

वीज कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 56 लाख घोटाळ्याच्या आरोपाने गाजली..!

नांदेड, १९ सप्टेबर २०२२ : वीज कामगार को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. नांदेडची वार्षिक सर्वसाधारण सभा कुसूमताई सभागृह, नांदेड येथे रविवार दिनांक १८ सप्टेबर रोजी पार पडली. सदरील सर्वसाधारण सभेत विद्युत कर्मचारी उपस्थित होते.

सोसायटीच्या सदस्यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपावर यावेळी सखोल चर्चा झाली. त्यामध्ये महादेव दालमिल येथील प्लॉटवर बांधकाम करणे करिता रुपये ४,५५,७३,२२९/- राखीव निधीमधून दोन कोटी रुपयाचे सोसायटीच्या कार्यालय बांधकाम करणे करिता मंजुरी घेण्यात आली.

सदरच्या बांधकामावर सर्व संघटनांचे प्रत्येकी एक एक प्रतिनिधी घेण्यात यावे जेणे करून बांधकाम प्रकरणात गैरप्रकार होणार नाहीत असे आवाहन सुनील टिप्परसे यांनी केले.

तसेच, सर्वसाधारण सभेमध्ये लोहा कॅश कलेक्शन घोटाळयातील छप्पन्न लाख प्रकरणात एकूण २८ संचालकांवर ठपका असताना फक्त एकाच संचालकाने पैशाचा भरणा केला आहे. त्यांचे सर्वसाधारण सभेत स्वागत करण्यात आले. बाकींच्या २७ संचालकांचे पुढे काय ? असा प्रश्न सुनील टिप्परसे यांनी सोसायटीच्या विद्यमान अध्यक्ष यांना उपस्थित केला.

सदरील वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक वादग्रस्त प्रश्नांने विद्युत कर्मचारी यांची सभा गाजली.

Back to top button
error: Content is protected !!