महाराष्ट्र
Trending

फुलंब्री: गणोरी, निधोना शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी ! कपाशीच्या शेतात 66 लाखांचा गांजा पकडला, तीन शेतकऱ्यांवर गुन्हा !!

औरंगाबाद, दि. 16 – राज्य उत्पादन शुल्क विभागाने फुलंब्री तालुक्यातील गणोरी व निधोना शिवारात छापा टाकून गांजाच्या शेतीचा पर्दाफाश केला. उस, कपाशीच्या शेतात लागवड केलेला सुमोर ६६ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. एकूण तीन शेतकर्यांच्या शेतामध्ये १०७ कॅनबीस वनस्पती (गाजांचे) झाडे ६४८ कि.ग्रॅ. व सुखलेला गांजा १० कि. ग्रॅ. मिळून आला. या कारवाईत एकूण ६६,०५,०००/- रुपयांचा कॅनबीस वनस्पती (गांज्याची झाडे) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रामभाऊ अमृता तांदळे (रा. गणोरी ता. फुलंब्री जि.औरंगाबाद), सुखलाल फंदुसिंग जंगाळे (रा. निधोना ता. फुलंब्री जि. औरंगाबाद), कारभारी शामलाल गुसिंगे (रा. निधोना ता. फुलंब्री जि. औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनील चव्हाण, औरंगाबाद विभागाचे विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १६/११/२०२२ रोजी प्रदीप पोटे, उप-अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (मुख्यालय), औरंगाबाद व विजय रोकडे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, औरंगाबाद यांना गुप्त गांज्याच्या शेतीची माहिती मिळाली.

या बातमीच्या अनुषंगाने रामभाऊ अमृता तांदळे (रा. गणोरी ता. फुलंब्री) यांच्या मालकीचे गणोरी शिवारातील गट क्र. २४ मधील शेतात, सुखलाल फंदुसिंग जंगाळे (रा. निधोना ता. फुलंब्री) यांच्या मालकीच्या निधोना शिवारातील गट न. १२५ मधील शेतात, कारभारी शामलाल गुसिंगे (रा. निधोना ता. फुलंब्री) यांच्या निधोना शिवारातील गट न. ११९ मधील शेतात एनडीपीएस अॅक्ट १९८५ अन्वये छापा मारला.

सदरील ठिकाणी रामभाऊ अमृता तांदळे यांच्या मालकीचे गणोरी शिवारातील गट क्र.२४ मधील उस व कपासीच्या पिकामध्ये कॅनबीस वनस्पती (गाजांचे) एकूण ४५ (८-१० फुट उंचीचे) झाडे ज्याचे एकूण वजन ५२० कि.ग्रॅ. मिळून आलेले आहे. तसेच सुखलाल फंदुसिंग जगांळे (रा. निधोना ता. फुलंब्री) यांच्या मालकीच्या निधोना शिवारातील गट न. १२५ मधील कपासीच्या पिकामध्ये कॅनबीस वनस्पती (गाजांचे) एकूण ४० (४-७ फुट उंचीचे) झाडे ज्याचे एकूण वजन ५३ कि. ग्रॅ. मिळून आलेले आहे.

तसेच त्यांच्या शेतात सुखलेला कॅनबीस वनस्पती गांजा १० कि.ग्रॅ. मिळून आलेला आहे. कारभारी शामलाल गुसिंगे (रा. निधोना ता. फुलंब्री) यांच्या निधोना शिवारातील गट न.११९ मधील कपाशीच्या पिकामध्ये कॅनबीस वनस्पती (गाजांचे) एकूण २२ (५-६ फुट उंचीचे) झाडे ज्याचे एकूण वजन ७५ कि.ग्रॅ. मिळून आलेले आहे.

सदरील तिन्ही शेतामध्ये एकूण १०७ कॅनबीस वनस्पती (गाजांचे) झाडे ज्याचे एकूण वजन ६४८ कि.ग्रॅ. व सुखलेला गांजा १० कि. ग्रॅ. मिळून आलेला आहे. या कारवाईत एकूण ६६,०५,०००/- रुपयांचा कॅनबीस वनस्पती (गांज्याची झाडे) चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. घटनास्थळावरून सदरील जमीनीचे मालक १. रामभाऊ अमृता तांदळे (रा. गणोरी ता. फुलंब्री जि.औरंगाबाद), २. सुखलाल फंदुसिंग जंगाळे (रा. निधोना ता. फुलंब्री जि. औरंगाबाद), ३. कारभारी शामलाल गुसिंगे (रा. निधोना ता. फुलंब्री जि. औरंगाबाद) यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरूद्ध एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे कलम २० अन्वये गुन्हे नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास विजय रोकडे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, औरंगाबाद हे करीत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने फुलंब्री तालुक्यात एनडीपीएस अॅक्ट १९८५ अन्वये एकूण तीन गुन्हे नोंद केलेले असून ही कारवाई उप-अधीक्षक प्रदीप पोटे, निरीक्षक जे. जे. कुरेशी,  राहुल गुरव, नारायण डहाके, शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक जी. एस. पवार, एस.बी. रोटे, ए.ई. तातळे, भरत दौड, जी. बी. इंगळे, बोलाजी वाघमोडे, शीतल पाटील, शाहु घुले, शिवराज वाघमारे, प्रदीप मोहिते,

सहाय्यक दुय्यम निरीक्षक- गणेश नागवे, प्रविण पुरी, अनंत शेंदरकर, सुभाष गुंजाळे, जवान युवराज गुंजाळ, रविंद्र मुरडकर, अनिल जायभाये, गणपत शिंदे, ठाणसिंग जारवाल, ज्ञानेश्वर सांबारे, विजय मकरंद, योगेश कल्याणकर, अमित नवगिरे किशोर ढाले, मयुर जैस्वाल, योगेश घुनावत, राहुल बनकर सुमिध सरकाटे व वाहनचालक सचिन पवार, शारीक कादरी, किसन सुदडे, विनायक चव्हाण, अमोल अन्नदाते तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे सहाय्यक रासायनिक विश्लेषक डॉ. संतोष कोते व रामेश्वर काकडे (प्रयोगशाळा परिचर ) त्याचप्रमाणे फुलंब्री तालुका नायब तहसीलदार के.जे. काथार व तलाठी दाढे, बागुल यांच्या पथकाने केली.

Back to top button
error: Content is protected !!