महाराष्ट्र
Trending

सिटीबसच्या खिडकीतून बाहेर बघताना डोक्याला मार लागून शाळकरी मुलाचा मृत्यू ! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मैदान परिसरातील हृदयद्रावक घटना !!

छत्रपती संभाजीनग, दि. 10 : सोमवारी दुपारी सिटी बस मध्ये बसलेल्या एका 15 वर्षीय मुलाला खिडकी मधून बाहेर बघताना औरंगपुरा बस स्थानक येथे डोक्याला गंभीर मार लागला. या अपघातात सदर मुलाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद स्मार्ट सिटी सीईओ डॉ अभिजित चौधरी यांनी सांगितले की, सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे व सिटी बस प्रशासनाकडून मुलाच्या कुटंबियाना शक्य तेवढी मदत करण्यात येईल.

सोमवारी दुपारी जवळपास 12.30 वा बस क्रमांक एम एच 20 इ जी 9862 साजापूर ते औरंगपुरा मार्गाची अंतिम फेरी करून औरंगपुरा बस स्थानकाला परतली होती. डेपो वर बस घेऊन जायला बस फिरवण्यासाठी ड्रायव्हरने जिल्हा परिषद मैदानात नेत असताना काही शाळकरी मुलं बस मध्ये येऊन बसले. यात सरस्वती भुवन विद्यालयाचा नववी वर्गात असलेल्या हरिओम राधाकृष्ण पंडित बसच्या एकदम शेवटच्या सीट वर जाऊन बसला व खिडकीतून बाहेर बघत होता. तेव्हाच त्याचा डोक्याला मैदानाच्या गेट लगत लोखंडी पोलचा मार लागला व तो जखमी झाला.

बस ड्रायव्हर कपिल अशोक लोखंडे व कंडक्टर योगेश बिडवे हे लगेच मुलाला रिक्षाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयला घेऊन गेले. घटनेची माहिती मुलाच्या कुटुंबाला देण्यात आली. दरम्यान, रुग्णालयात मुलाला मृत घोषित करण्यात आले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटी चे सीईओ डॉ अभिजित चौधरी म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मुलाच्या कुटुंबाला शासनाच्या निकषाप्रमाणे शक्य तेवढी मदत करण्यात येईल.

सोमवार संध्याकाळपर्यंत सदर शव विच्छेदनाचा अहवाल अपेक्षित आहे. या घटनेची नोंद क्रांतीचौक पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!