महाराष्ट्र
Trending

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यकावर लाच घेतल्याप्रकरणी अहमदनगरच्या कोतवालीमध्ये गुन्हा ! बिल मंजूर करण्यासाठी शिक्षकाला मागितली लाच !!

अहमदनगर, दि. 20 – शिक्षक पत्नीचा महामारी कोरोनामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याचे बिल मंजूर करण्यासाठी शिक्षकाला लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला वरिष्ठ सहाय्यकावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदा चंद्रकांत ढवळे (वय ४५ वर्षे, वरिष्ठ सहाय्यक वर्ग-३ प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षक आहेत. तक्रारदार यांची पत्नी मे व जून २०२१ मध्ये कोरोना आजाराने आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी नगर मधील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

तक्रारदार यांनी पत्नीचे वैद्यकीय उपचाराचे बील स्वत भरले व त्यानंतर सदरचे बील जिल्हा परिषद मधून मंजूर होऊन मिळणेकरीता सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह पंचायत समिती श्रीरामपूर मार्फत जुलै २०२१ मध्ये दाखल केले. सदर बील मंजुर करण्याकरीता यातील आरोपी चंदा चंद्रकांत ढवळे (वय ४५ वर्षे, वरिष्ठ सहाय्यक वर्ग-३ प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर) यानी तक्रारदार यांच्याकडे रु ५०००/- लाचेची मागणी केली.

याबाबतची तक्रार, तक्रारदार यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ०७/११/२०२२ रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथे पंच साक्षीदारा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी चंदा चंद्रकांत ढवळे यांनी तक्रारदार यांच्याकडे रु.५०००/- लाचेची मागणी केली.

सदर रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून दि १७/११/२०२२ रोजी आरोपी चंदा ढवळे यांच्याविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन (जि.अहमदनगर) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!