महाराष्ट्र
Trending

भाजप नेते नारायण राणेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा !

पुणे, 20 ऑक्टोबर केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते नारायण राणे यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे पदाधिकारी योगेश शिंगटे यांनी बुधवारी रात्री डेक्कन पोलिस ठाण्यात जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, आमदार भास्कर जाधव यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम ५०५ (लोकांमध्ये भीती किंवा चिंता निर्माण करण्याच्या हेतूने किंवा संभाव्यतेने), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), 500 आणि 153A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव यांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील सभेला संबोधित करताना राणेंची खिल्ली उडवली होती आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

Back to top button
error: Content is protected !!