माजी सैनिकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, कुटुंबापासून दूर नौकरी करणाऱ्या माजी सैनिकांना मिळणार पाहिजे तेथे बदली !!
समुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण- प्राधान्यक्रमात पुर्ननियुक्त माजी सैनिकांचा समावेश करण्याचा आदेश निघाला
- शासकीय कर्मचारी पुनर्नियुक्त माजी सैनिक असल्यास व त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र दि. ३० एप्रिल पूर्वी बदली प्राधिकाऱ्याकडे सादर केल्यास त्यांची प्रशासकीय सोयीनुसार व पद उपलब्धतेनुसार त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली करण्यात यावी, असा शासन निर्णय राज्य सरकारने पारित केला आहे.
मुंबई, दि. 22 – माजी सैनिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आपल्या कुटुंबापासून दूर नौकरी करणाऱ्या माजी सैनिकांना आता प्राधान्यक्रमाने पुर्ननियुक्ती मिळणार आहे. बदली धोरणात बदल करण्यात आला असून यामुळे राज्य सरकारच्या सेवत असणाऱ्या माजी सैनिकांना आता प्राधान्याने पाहिजे तेथे बदली मिळणार आहे. राज्य सरकारने हा शासन निर्णय लागू केला आहे.
दिनांक ९ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयान्वये समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयानुसार समुपदेशनाने बदलीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे प्राधान्य क्रम निश्चित करण्यात आले आहेत.
सैनिकांना केंद्रीय सैन्य दलातील सेवा करताना प्रदीर्घ काळ त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर रहावे लागते. यास्तव त्यांची केंद्र शासनाच्या सैन्यदलातील सेवा संपल्यावर ज्यावेळी माजी सैनिक कोट्यातून राज्य शासकीय सेवेत नियुक्ती होते त्यावेळी बदली अधिनियमानुसार बदली करताना, समुपदेशनाने बदलीतील प्राधान्य क्रमात माजी सैनिकांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
संदर्भाधीन दि. ९ एप्रिल, २०१८ च्या शासन निर्णयात प्राधान्यक्रम नव्याने अंतर्भूत करण्यात येत आहे. तो असा… शासकीय कर्मचारी पुनर्नियुक्त माजी सैनिक असल्यास व त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र दि. ३० एप्रिल पूर्वी बदली प्राधिकाऱ्याकडे सादर केल्यास त्यांची प्रशासकीय सोयीनुसार व पद उपलब्धतेनुसार त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली करण्यात यावी, असा शासन निर्णय राज्य सरकारने पारित केला आहे. यामुळे आपल्या घरांपासून दूर नौकरी करणाऱ्या माजी सैनिकांना दिलासा मिळाला आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट