महाराष्ट्र
Trending

पदवीधर गटातील 13 अपील स्पष्टीकरणासह फेटाळले ! उमेदवारी मागे घेण्याचा उद्या अखेरचा दिवस !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक

Story Highlights
  • केवळ मोहम्मद अझरुद्दीन यांचे अपील मंजूर
  • अपिलानंतर प्रत्येकी एक अर्ज वैध तर एक अवैध

औरंगाबाद, दि.१०:  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पदवीधर गटातून ९० उमेदवार अर्ज वैध तर छाणनीत ९ जणांचे अर्ज अवैध ठरले असून या संदर्भात दाखल १४ अपिलांवर कुलगुरु यांच्याकडे सुनावणी होऊन, सर्व १४ ही अपील स्पष्टीकरणासह फेटाळण्यात आले आहेत.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे ९ उमेदवारांनी अपिल दाखल केले. तसेच त्रयस्थ पदाची पाच अपिले दाखल झाली. या सर्व अपिलांवर बुधवारी व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी सुनावणी घेतली. यावेळी अपिल धारकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर कुलगुरु यांनी संपूर्ण प्रकरण समजून घेऊन स्पटीकरणासह अपिलांवर निर्णय घेतले.

यामध्ये १३ अपिले फेटाळण्यात आली. यामध्ये मीनाक्षी प्रल्हादराव शिंदे, मोहन माणिक जाधव, विजय रामधन आडे, हनुमंत रघुनाथ गुट्टे, (दोन अपीले) गजानन निवृत्तीनाथ डुकरे, मीनाक्षी श्रीधर भवर, ओम बाबासाहेब बडे, पंकज एकनाथ कुटे, प्रकाश नामदेव वाघमारे, शिरीष मिलिंदराव कांबळे व डॉ.गजानन सानप यांच्या आपिलांचा समावेश आहे.

तर खुल्या प्रवर्गातून उमेदवारी दाखल केलेल्या मोहम्मद अझरुद्दीन मोहम्मद सलीम यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला होता. मात्र अपिलानंतर आता सर्व अर्ज वैध ठरला आहे. तर यापूर्वी वैध ठरलेला महेश भीमराव उबाळे यांचा अर्ज संस्थाचालक गटातून त्यांचे मतदार यादीत नाव असल्यामुळे पदवीधर गटातून अवैध ठरविण्यात आला आहे. संबंधित अपिलाबाबत स्पष्टीकरणासह निकल लावण्यात आले. तसेच वैध व अवैध उमेदवारींची अंतिम यादी गुरुवारी (दि.१०) सायंकाळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

अधिसभा, विद्यापरिषदेचा निवडणूक कार्यक्रम कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणा-या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये खुल्या गटातून पाच तर आरक्षित गटातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. या निवडणूकीत दाखल झालेल्या अर्जांची शनिवारी छानणी होऊन रविवारी रात्री वैध-अवैध अमेदवारांची यादी घोषित करण्यात आली. यामध्ये खुल्या प्रवर्गातून ४४ अर्ज वैध ठरले असून ४ अर्ज अवैध ठरले आहेत तर महिलांमध्ूान ७ पैकी २ तर भटके विमुक्त जाती अर्ज अवैध ठरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :-

खुला प्रवर्ग – मोहम्मद अझरुद्दीन मोहम्मद सलीम, प्रकाश नामदेव वाघमारे, बेग एजाज साहेब, पंकज एकनाथ कुंटे, महिला – शिंदे मीनाक्षी प्रल्हादराव, मीनाक्षी श्रीधर भवर, भटके विमुक्त जाती-जमाती विजय रामधन आडे, ओम बाबासाहेब बडे मोहन माणिक जाधव या ९ उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, या यादीसंदर्भात अपील सोमवारी (दि.सात) दाखल झाले. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या दालनात बुधवारी (दि.नऊ) अपीलांवर सुनावणी होऊन १० नोव्हेंबर रोजी वैध-अवैध उमेदवारंची अंतिम यादी घोषित करण्यात आली. दि.११ रोजी सकाळी १०ः३० ते ५ दरम्यान अर्ज मागे घेण्यात येतील. शुक्रवारी दि.११ अंतिम उमेदवारी यादी घोषित करण्यात येणार आहे. प्रवर्गनिहाय दाखल अर्ज व वैध उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे-

अनुसूचित जाती – बनसोडे निवृत्ती विश्वनाथ, दुर्गे जगन रुपचंद, जोगदंड रोहित दिपक, कांबळे शिरीष मिलिंदराव, मगरे सुनिल यादवराव, सुरडकर अनिल सांडू,तायडे राहुल भिमराव, वाघमारे प्रकाश नामदेव (एकूण अर्ज -९)

अनुसूचित जमाती – बर्डे भागवत रामप्रसाद, डुकरे गजानन निवृत्ती, जामुनकर अविनाश हिरजी, माळी शहाजी विश्वनाथ, मोहम्मद अजारुद्दीन मोहम्मद सलीम, निकम सुनिल पुंडलिकराव, राठोड पुनम महेश (एकूण अर्ज -७)

वि.जा/भ.ज – आघाव विनोद संतोष, आंधळे आश्रूषा दगडू, भांगे दत्तात्रय सुंदरराव, भोसले संभाजी शिवाजीराव, गडदे विठ्ठल यशवंत, गुट्टे हनुमंत रघुनाथ, जाधव सुनील नामदेव, कदम अमर अंबादासराव, काळबंडे अशोक संपतराव, काळबंडे संजय संपतराव,  कांबळे रररखमाजी भागुजी, काळे हर्षेमाला नरेंद्र, कांबळे रखमाजी भागुजी, फड चंद्रकांत शिवाजीराव, राठोड केशरचंद नारायण, सलामपुरे पुनम केशव, राठोड केशरचंद नारायण (एकूण अर्ज -१९)

इतर मागास वर्ग उमेदवार : जाधव संदीप दत्तात्रय, काळे राजीव आबाराव, काळे संतोष व्यंकटराव, खैरनार भारत रामदास, राऊत सुभाष किसनराव, सय्यद सज्जाद एकबाल, शेख अब्दुल मजिद अब्दुल मेहमूद मनियार, थोरात संतोष कारभारी, वाघ गणेश लक्ष्मण (एकूण अर्ज -९)

महिला उमेदवार – गायकवाड नंदा लक्ष्मणराव, काळे हर्षेमाला नरेंद्र, कुलकर्णी भाग्यश्री रमाकांतराव, पाटील पुनम वैâलास, तुपे ज्योती आसाराम (एकूण अर्ज -७)

खुला – अंबेवाडीकर निलेश सिद्राम, बाहेती अक्षय ऋषिकेश, बनसोडे पंकज बळीराम, भांगे दत्तात्रय सुंदरराव, भोसले संभाजी शिवाजीराव, भुतेकर रमेश खुशालराव, चक्रनारायण सागर दिवाकर, चव्हाण चंद्रकांत सोपानराव, धुमाळ संभाजी तुकाराम, धूपे सतिष असाराम, फंदे नितीन सत्यप्रेम, गवते  सुनील अकुंशराव, गवई विकास दत्तू, गुट्टे हनुमंत रघुनाथ, होके पाटील योगिता अशोकराव़, इंगळे सुचिता चोखाजी, जाधव सुनिल नामदेव, कदम अमर अंबादासराव, काळे हर्षेमाला नरेंद्र, काळे नरेंद्र हिरालाल, काळे सुनिल एकनाथराव, कांबळे रखमाजी भागुजी, खैरनार भारत रामदास, खोतकर पल्लवी आण्णासाहेब, मोटे प्रकाश नामदेवराव, नावंदर आशिष गोविंदप्रसाद, नवले लक्ष्मण उत्तमराव, निकम भागवत कुर्मादास, पवार विजय दादासाहेब, सलामपुरे पूनम केशव, सराफ तुकाराम शरदराव, सरकटे विलास वैâलास, शेख अमर उस्मान, शेख जहूर खालेद, शिंदे मीनाक्षी प्रल्हादराव, शिंगटे अमोल सर्जेराव, सिद्दीकी मोहम्मद शोएब मोहम्मद रजीउद्दिन सिद्दीकी, सोमवंशी हरिदास भगवानराव, तडवी अनिस शरीफ, तुपे पंडीत महीपती,  वाघ गणेश लक्ष्मण, वाघमारे परमेश्वर कचरु (एकूण अर्ज – ४४ अर्ज).

Back to top button
error: Content is protected !!