राष्ट्रीय
Trending

महिला पोलिसाचे ऑनड्युटी कंट्रोल रुममध्ये फिल्मी गाण्यांवर ठुमके ! व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर दिली तंबी !!

ड्युटीवर असताना नाचणाऱ्या उत्तराखंडच्या महिला पोलिसांना इशारा

Story Highlights
  • कर्तव्यावर असताना भविष्यात असे कृत्य निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.
  • व्हिडिओमध्ये महिला पोलिस गणवेशात नसून, मागील भागात संगणक आणि फोन दिसत आहेत. हा व्हिडिओ 112 डेहराडून कंट्रोल रूमचा असल्याची पुष्टी झाली, जो दिवाळीच्या रात्री बनवण्यात आला होता.

डेहराडून, 2 नोव्हेंबर– नियंत्रण कक्षात तैनात असलेल्या उत्तराखंडच्या महिला पोलिसांचा ड्युटीवर असताना फिल्मी गाण्यांवर नाचतानाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे, ज्यासाठी त्यांना कडक ताकीद देण्यात आली आहे.

व्हिडिओमध्ये महिला पोलिस गणवेशात नसून, मागील भागात संगणक आणि फोन दिसत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर अचंबित झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपास केला असता, हा व्हिडिओ 112 डेहराडून कंट्रोल रूमचा असल्याची पुष्टी झाली, जो दिवाळीच्या रात्री बनवण्यात आला होता.

अतिरिक्त पोलिस महासंचालक (दूरसंचार) अमित सिन्हा यांनी सांगितले की, या प्रकरणात सहभागी असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना भविष्यात असे घडू नये, अशा कडक शब्दांत इशारा देण्यात आला आहे. कर्तव्यावर असताना भविष्यात असे कृत्य निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Back to top button
error: Content is protected !!